डोंबिवली, 3 जुलै : मान्सूनचं आगमन यंदा उशीरा झालं असलं तरी गेल्या आठवड्यात दमदार पाऊस झालाय. विशेषत: मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा चांगला जोर आहे. पावसाळी वातावरणात गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. हे पदार्थ खाण्यापूर्वी तब्येतीचं भानंही जपलं पाहिजे. पावसाळ्यात कोणते पदार्थ खावे? कोणते टाळावे? याबाबत डोंबिवलीतील आयुर्वेदाचार्य डॉक्टर महेश पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. मुलांची इम्युनिटी वाढवा! पावसाळयात शाळा सुरू होतात. या काळात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होते. अशावेळी लहान मुलांची इम्यूनिटी वाढवणे गरजेचे आहे. लहान मुलांना दिवसातून 3 ते 4 पिस्ता, बदाम , आक्रोड यासारख्या गोष्टी खाणे आवश्यक असते. अक्रोड मध्ये ओमिगा 3 अधिक असून यात फायबर देखील मोठ्या प्रमाणत असतात, असं पाटील यांनी सांगितलं. लवंग, वेलची, दालचिनी असे पदार्थ पाण्यात टाकून उकळवायचे आणि या मसाल्याचा काढा बनवून प्यायचा. यामुळे कोणत्याही व्हायरसचा त्रास होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
‘या’ गोष्टी लक्षात ठेवा या पावसाच्या महिन्यात मासे खाणे टाळावे. समुद्रातून किंवा ज्या पाण्यातून मासे आणले जातात त्या पाण्यात जीव जंतू अधिक प्रमाणत असण्याची शक्यता असते. यामुळे हे मासे आपण खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो. घरातून बाहेर जाताना चणे, शेंगदाणे, बदाम, पिस्ता या गोष्टी जवळ ठेवा. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळता येईल, असा सल्लाही पाटील यांनी दिला. कुत्र्यांसोबत खेळायला आवडतंय? डोंबिवलीतील ‘या’ कॅफेत घ्या मनमुराद आनंद, Video पावसाळ्यात भाज्या, फळं खराब होण्याची शक्यता असते. यामधून होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी येण्यासाठी नेहमीच्या भाजीविक्रेत्याकडून भाजी घ्यावी. पावसाळ्यात तब्येत सांभाळण्यासाठी पाणी उकळून पिणे, उघड्यावरील पदार्थ खाणे टाळणे तसंच घरगुती आहार अधिक प्रमाणात घेणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉ. पाटील यांनी दिलाय.