JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शरीराला कोणत्या व्हिटॅमिनची किती गरज? जास्त सेवन आरोग्याला घातक

शरीराला कोणत्या व्हिटॅमिनची किती गरज? जास्त सेवन आरोग्याला घातक

कोणत्या व्हिटॅमिनची शरीराला किती गरज आहे, याची माहिती असणं आवश्यक आहे. ती माहिती डॉक्टरच देऊ शकतात, पण आजकाल लोक सोशल मीडियावरील माहितीवरून कमी-जास्त सेवन करतात.

जाहिरात

ATTACHMENT DETAILS

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मार्च : आपल्या शरीराने योग्यरित्या कार्य करावं, या साठी व्हिटॅमिन्स आवश्यक असतात. पण त्याचं किती सेवन करणं योग्य आहे, याची माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणत्या व्हिटॅमिनची शरीराला किती गरज आहे, याची माहिती असणं आवश्यक आहे. ती माहिती डॉक्टरच देऊ शकतात, पण आजकाल लोक सोशल मीडियावरील माहितीमुळे प्रभावित होऊन मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्सची गरज किंवा कार्यक्षमता समजून न घेता सेवन करतात. जीवनसत्त्वे B, K, D, B12, बायोटिन, झिंक, मॅग्नेशियम आणि इतर अनेक सप्लिमेंट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्यांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नसते. पण रोजच्या ठराविक मर्यादेपेक्षा याचे जास्त सेवन केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेकदा आपल्या आहारामुळे होणारी व्हिटॅमिनची कमतरता आहारात बदल करून दूर केली जाऊ शकते आणि आपल्याला सप्लिमेंट्स घेण्याची आवश्यकता नसते. पण, लोक सहसा स्वत:च त्याचं निदान करून सप्लिमेंट्स घेतात. पण यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त होऊ शकतं. एखाद्याला वाटत असेल की व्हिटॅमिन आपल्या शरीराला कोणतीही हानी पोहोचवू शकत नाहीत. पण तसं नाही. योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचे नुकसान नाही, पण ते जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या इंटर्नल अवयवांना खूप जास्त हानी पोहोचवू शकतात. Diabetes रुग्णांनी गोड गोड Watermelon खाल्लं तर काय होईल? हा VIDEO पाहिला नाही तर पस्तावाल

 व्हिटॅमिन ए – ओव्हरडोसमुळे थोडी मळमळ आणि गंभीर इंट्राक्रॅनियल प्रेशर होऊ शकते आणि जर ते जास्त असेल तर माणूस कोमामध्ये जाऊ शकतो किंवा मृत्यूही होऊ शकतो. एकाच वेळी हायपरव्हिटॅमिनोसिस ए 200 मिग्रॅ व्हिटॅमिन ए घेतल्याने हे होऊ शकतं.

व्हिटॅमिन बी - या व्हिटॅमिनचे अनेक उपप्रकार आहेत आणि त्यापैकी कोणत्याही व्हिटॅमिनच्या ओव्हरडोसमुळे हाय ब्लड प्रेशर, ओटीपोटात दुखणे, स्पष्ट न दिसणे आणि लिव्हर डॅमेज यांसारखी लक्षणं दिसू शकतात. यासोबतच, व्हिटॅमिन बी 6 च्या अतिसेवनामुळे मळमळ, छातीत जळजळ, त्वचेचे विकार आणि लाइट सेन्सिटिव्हिटी होऊ शकते. व्हिटॅमिन सी - व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनामुळे डायरिया, पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि मायग्रेन होऊ शकतो. Hair Care : पातळ केसांसाठी या 5 पद्धतींनी वापरा कांद्या, काही दिवसात केस होतील दाट आणि मजबूत   व्हिटॅमिन डी - भूक न लागणे, हृदयाचे अनियमित ठोके, अचानक वजन कमी होणे आणि अवयवांचे नुकसान होणे ही सर्व लक्षणे व्हिटॅमिन डीच्या ओव्हरडोसमुळे दिसतात. व्हिटॅमिन ई - व्हिटॅमिन ईच्या ओव्हरडोजमुळे ओटीपोटात दुखू शकते आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. व्हिटॅमिन के - व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जर कुणी रक्त पातळ करणारी औषधं वॉरफेरिन किंवा अँटीबायोटिक्स घेत असेल तर त्यांनी व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात घेऊ नये, कारण ते औषधांच्या क्रियांमध्ये अडथळा आणू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या