मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes रुग्णांनी गोड गोड Watermelon खाल्लं तर काय होईल? हा VIDEO पाहिला नाही तर पस्तावाल

Diabetes रुग्णांनी गोड गोड Watermelon खाल्लं तर काय होईल? हा VIDEO पाहिला नाही तर पस्तावाल

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मधुमेही रुग्ण कलिंगड खाऊ शकतात का?, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 24 मार्च : उन्हाळा म्हटलं की कलिंगड आलंच. लालबुंद, रसरशीत, रवाळ, रसाळ, गोड कलिंगड खायला अनेकांना आवडतं. उन्हाळ्यात कलिंगड खायलाच हवं, यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाणही चांगलं राहतं. कलिंगड खाण्याचे आरोग्याला इतरही बरेच फायदे होतात. उन्हाळ्यात कलिंगड खावं खरं पण ते गोड असतं, त्यामुळे कलिंगड खाल्ल्याने मला डायबेटिज तर होणार नाही ना? माझी ब्लड शुगर तर वाढणार नाही ना? अशी भीती बऱ्याच जणांना वाटते.

कलिंगड गोड असल्याने मधुमेही रुग्ण ते खाऊ शकतात की नाही? अशा प्रश्न अनेकांना पडतो. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आम्ही घेऊन आलो आहेत. किंबहुना कलिंगड खाल्लं तर शरीरातील रक्तशर्करेवर त्याचा नेमका कसा, किती परिणाम होतो, हेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे, तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

उन्हाळ्यात कलिंगड खाताय सावधान! आधी हा VIDEO जरूर पाहा

डायबेटिज गुरूजी या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात मधुमेहींनी कलिंगड खाल्ला तर त्यांच्या ब्लड शुगरवर काय परिणाम होतो हे प्रत्यक्षात दाखवण्यात आलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आपली सकाळची डायबेटिज टेस्ट करते. त्यानंतर जवळपास 200 ग्रॅम कलिंगड खाते आणि त्याच्या दोन तासांनी पुन्हा डायबेटिज टेस्ट करते.

तुम्ही पाहिलं तर कलिंगड खाण्याआधी या व्यक्तीची ब्लड शुगर 182 होती आणि खाल्ल्यानंतर ती 184 झाली. ही तफावत फार नाही आहे. याचा अर्थ तुम्ही कलिंगड खाऊ शकता.

" isDesktop="true" id="854897" >

मधुमेह तज्ज्ञ डॉ. अनुपम घोष यांनीही DIAAFIT या युट्यूब चॅनेलवर मधुमेहींनी कलिंगड खावं की नाही, याबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले, कलिंगड गोड आहे, यात शुगर खूप असतं. त्यामुळे मधुमेहींनी कलिंगड खाऊ नये, असा सल्ला देतात. कलिंगडाचं ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतं. असे पदार्थ डायबेटिज रुग्णांनी खाऊ नये. पण ग्लायसेमिक इंडेक्सच सर्वकाही नसतं. यापेक्षा ग्लायसेमिक लोड महत्त्वाचं आहे.

वाट्टेल तेव्हा खाऊन चालत नाही; कलिंगड खाण्याची 'ही' योग्य वेळ, नाहीतर फायद्याऐवजी नुकसान होईल

ग्लायसेमिक इंडेक्स 10 च्या खाली असेल तर तुम्ही ते खाऊ शकता, 20 च्या वर असेल तर खाऊ नका. 100 ग्रॅम कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 आहे पण ग्लासेमिक लोड 5.8 असतं. जे 10 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ तुम्ही इतक्या प्रमाणात कलिंगड खाऊ शकता. याचा शुगर लेव्हलवर फरक पडणार नाही.

" isDesktop="true" id="854897" >

उलट कलिंगड खाल्ल्याने डायबेटिज रुग्णांना फायदाच होतो. यात व्हिटॅमिन ए, सी, बी-6, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न असतं. यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन, मिनरल्स मिळतात. कलिंगडाचा लाल रंग म्हणजे यात लायकोपिन असतं. हृदयासाठी हे चांगलं असतं. मधुमेहींना हार्टच्या समस्येचा धोका असतो. त्यामुळे कलिंगड खाल्ल्यास त्यांना हार्टची समस्या कमी होऊ शकते, असं डॉ. घोष म्हणाले.

त्यामुळे डायबेटिज आहे, ब्लड शुगर वाढेल या भीतीने तुम्ही उन्हाळ्यात कलिंगड खाणं टाळत असाल, तर पचतावाल.

First published:
top videos

    Tags: Diabetes, Fruit, Health, Lifestyle, Summer