JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त 20 दिवस मिळणाऱ्या या फळाची अमृताशी होते तुलना, पाहा काय आहे कारण?

फक्त 20 दिवस मिळणाऱ्या या फळाची अमृताशी होते तुलना, पाहा काय आहे कारण?

प्रामुख्याने ही फळं हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळतात. किंमत जास्त असल्याने बाजारात ती फार काळ टिकत नाहीत.

जाहिरात

बाजारात हिरवं आणि लाल अशात दोन प्रकारांत हे फळ उपलब्ध असतं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मोहित शर्मा, प्रतिनिधी करौली, 29 जुलै : बाजारात हंगामानुसार विविध फळांची, भाज्यांची रेलचेल पाहायला मिळते. त्यांची विशिष्ट अशी चवही असते आणि फायदेही विशेष असतात. आज आपण अशाच एका खास फळाविषयी जाणून घेणार आहोत, जे बाजारात केवळ 20 दिवस उपलब्ध असतं. ‘बाबूगोशा’ असं अनोखं नाव असणारं हे फळ आकारानेही वेगळं आणि मऊ असतं. मात्र चवीला अतिशय स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या या फळाची किंमत जरा जास्त असते. याला काही लोक ‘बब्बू गोशा’देखील म्हणतात. मधुमेहाच्या रुग्णांना हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या फळाविषयी फार कमी लोकांनाच माहिती असते. बाजारात ते दोन प्रकारांत उपलब्ध असतं. एक हिरव्या रंगात आणि एक लाल रंगात.

प्रामुख्याने ही फळं हिमाचल आणि जम्मू-काश्मीरमध्ये आढळतात. किंमत जास्त असल्याने बाजारात ती फार काळ टिकत नाहीत. राजस्थानच्या करौली भागात त्यांना 70 रुपये किलोचा भाव मिळतो. काहीवेळा हा दर 80 रुपयांवरही जातो. लांडोर आणि पोलिसांची अनोखी मैत्री; लोक म्हणतात, हे तर… आयुर्वेदिक डॉक्टर उमेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूगोशा फळात भरपूर प्रमाणात फायबर असतं. या फळामुळे शरीरातील पचनव्यवस्था सुरळीत राहते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होत नाही. तसंच थकवाही दूर होतो. शिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर ठरतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या