प्रतिकात्मक फोटो
बीजिंग, 04 मार्च : आपल्याला कधी ना कधी डोळ्याची समस्या उद्धवते. कधी डोळे चुरतात, कधी डोळे लाल होतात, कधी डोळ्यांना खाज येते, कधी डोळे दुखतात, कधी डोळ्यात काही तरी जातं. अशीच डोळ्याची समस्या घेऊन एक तरुण डॉक्टरांकडे गेला. पण त्याच्या डोळ्यात जे दिसलं ते पाहिल्यानंतर डॉक्टरही घाबरले. एकही डॉक्टर त्याच्यावर उपचार करायला तयार नाही. आमच्याकडे यावर उपचारच नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. चीनमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. हेनान प्रांतात राहणारा लियू ज्याने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या विचित्र समस्येबाबत सांगितलं आहे आणि लोकांकडून या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी मदत मागितली आहे. त्याचा हा व्हिडीओ चिनी सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. एक दिवस तो आपल्या कुटुंबासोबत बसून जेवत होता. तेव्हा त्याच्या डोळ्यात काही तरी गेल्याचं त्यांना दिसलं. पण त्याने ते गांभीर्याने घेतलं नाही. त्याच्या आईवडिलांनीही कधी कधी नसांमध्ये समस्या होते, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही असं म्हणून फार लक्ष दिलं नाही. बापरे! आधी डोळ्यांसमोर अंधार, नंतर आवाजही गेला; सिगारेटचा कश मारताच तरुणाची भयंकर अवस्था पण काही दिवसांनंतर त्याच्या डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. या वेदना वाढू लागल्या. लियुला वाटलं की त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र आहे. त्यानंतर त्याने लगेच रुग्णालयात धाव घेतली पण आपल्याकडे यावर उपचार नाही असं म्हणून कोणत्याच डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले नाही, असं तो म्हणाला.
आता असं या व्यक्तीच्या डोळ्यात होतं तरी काय?, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या व्यक्तीच्या दाव्यानुसार त्याच्या डोळ्यात दुसरं तिसरं काही नाही तर चक्क एक जिवंत कीडा आहे. हेनान ब्रॉडकास्टिंग सिस्टमच्या रिपोर्टनुसार हा कीडा व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीखाली आहे. त्यामुळे त्याच्या पापणीचा आकार वक्र दिसतो आहे. नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस तो म्हणाला, “मी कित्येक डॉक्टरांना दाखवलं पण कुणीच यावर उपचार करू शकलं नाही”. “डोळ्यातील या किड्यापासून माझी सुटका कशी करवून घेऊ”, असं त्यानं लोकांना विचारलं आहे.