अहमदाबाद, 04 मार्च : सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारकच आहे. स्मोकिंग चे तसे बरेच दुष्परिणाम आहेत, ते तुम्हाला माहितीही असतील. पण एका तरुणावर स्मोकिंगचा असं भयंकर परिणाम झाला आहे ज्याचा कुणी कधी विचारही केला नसेल. सिगारेटचा कश मारताच सुरुवातीला तरुणाच्या डोळ्यांसमोर अंधार आला, नंतर त्याचा आवाजही गेला. गुजरातमधील ही धक्कादायक घटना आहे. राजकोटच्या पदधारी गावातील गीतांग 2 परिसरात ही घटना घडली. किशना जेरामभाई चरण असं या तरुणाचं नाव आहे. 26 वर्षांचा किशना ज्याने सिगारेटचा एक कश मारला आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि तो खाली कोसळला. त्यानंतर त्याच्या तोंडातून आवाजही निघत नव्हता. त्याची बोलतीच बंद झाली. VIDEO - 5 वर्षे वेदना सहन केल्या, सिटी स्कॅन पाहून हादरलीच; महिलेच्या पोटात होतं… मीडिया रिपोर्टनुसार या तरुणाला अज्ञात लोकांनी सिगारेट प्यायला दिली. याच्या इतका भयंकर दुष्परिणाम झाला की तरुणाची अवस्था भयंकर झाली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. हे प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माहितीनुसार या तरुणाच्या घशात इन्फेक्शन झालं आहे ज्यामुळे तो आता बोलू शकत नाही. त्याचा आवाज गेला असं सांगितलं जातं आहे. स्मोकिंगमुळे सडली हाताची बोटं याआधी स्मोकिंगमुळे एका महिलेच्या हाताची बोटं सडू लागल्याचं प्रकरण समोर आलं होतं. दक्षिण आफ्रिकेतील 48 वर्षांची मेलिंडा जॅन्सेन व्हॅन वुरेनसोबत हे घडलं. धूम्रपानामुळे तिला दुर्मिळ आणि विचित्र आजार झाला. सुरुवातीच्या टप्प्यात मेलिंडा यांच्या बोटांचा रंग जांभळा होता, नंतर तो काळा झाला. बोटाच्या वरील भाग सडून आता झडण्याच्या मार्गावर आहे. वजन कमी करण्याची ही पद्धत महिलेच्या जीवावर बेतली; एक चूक आणि झाला मृत्यू मिरर यूके च्या रिपोर्टनुसार मेलिंडाने सांगितलं, “मी वयाच्या 13 व्या वर्षापासून धूम्रपान करत होते. एका दिवसात मी 15 सिगारेट ओढत होते ऑक्टोबर 2021 मध्ये माझ्या हातात मला काहीसा बदल जाणवू लागला. सुरुवातीला माझ्या हाताला तापमानातील बदल सहन होत नव्हता आणि त्यानंतर तो प्रमाणापेक्षा अधिक मऊ होत गेला. मेलिंडाच्या हातांची बोटं काळी पडत असल्याने डॉक्टरांनी याबाबत तपासणी केली. बोटांमधला हा बदल केवळ धूम्रपानामुळेच आहे, असं तपासणीअंती दिसून आलं. ही समस्या खूप दुर्मिळ मानली जाते. यामध्ये लहान आणि मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांमध्ये (Blood vessels) रक्ताची गुठळी तयार होऊ लागते आणि त्या फुगतात