मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस

नियतीचा अजब खेळ! एकाच वेळी 4 बाळांना जन्म देऊनही मिळालं आई होण्याचं सुख; रिकामी राहिली कूस

4 बाळांना जन्म दिल्यानंतर धक्कादायक घडलं.

4 बाळांना जन्म दिल्यानंतर धक्कादायक घडलं.

एकाच वेळी 4 बाळांना जन्म देण्याचा आनंदही महिलेला काही क्षण जगता आला नाही. कारण डिलीव्हरीनंतर धक्कादायक घडलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

दीप श्रीवास्तव/लखनऊ, 04 मार्च : देव जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो, नाहीतर काहीच नाही. असंच एका महिलेसोबत घडलं आहे. जिने एक दोन नव्हे तर एकाच वेळी तब्बल 4 बाळांना जन्म दिला.  4-4 बाळांची आई होण्याचा आनंद या महिलेच्या चेहऱ्यावर येतो न येतो तोच काही क्षणात तिचा हा आनंद हिरावला गेला. एकाच वेळी चार बाळांना जन्म देऊनही आई होण्याचं सुख तिला काही मिळालं नाही. नियतीने तिच्यासोबत असा अजब खेळ केला की तिची कुस रिकामीच राहिली. उत्तर प्रदेशमधील ही हृदयद्रावक घटना आहे.

यूपीतील शाहजहांपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये एका महिलेला डिलीव्हरीसाठी दाखल करण्यात आलं. शिवानी असं या महिलेचं नाव आहे. तिची डिलीव्हरी झाली. एकाच वेळी तिने एकूण 4 बाळांना जन्म दिला. यात तीन मुली आणि एक मुलगा होता. पण जन्मानंतर एकही बाळ या जगात राहिलं नाही. ना या महिलेला आई होण्याचं सुख लाभलं.

चार बाळांपैकी तीन मुलींचा प्रसूतीदरम्यानच मृत्यू झाला. कसाबसा मुलगा प्रसूतीवेळी जिवंत होता. पण नंतर उपचारानंतर त्यानेही जीव सोडला. माहितीनुसार महिलेची प्रकृती सध्या ठिक आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बापरे! आधी डोळ्यांसमोर अंधार, नंतर आवाजही गेला; सिगारेटचा कश मारताच तरुणाची भयंकर अवस्था

रुग्णालयात पहिल्यांदाच एका महिलेने एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिला होता. पण काही क्षणातच तिथंच या चारही बाळांचा मृत्यू झाल्याने सर्वांना धक्का बसला.

यूपीमध्ये 2021 सालीही एका महिलेने एकाच वेळी 4 मुलांना जन्म दिला होता. यात मुलं आणि एका मुलीचा समावेश होता. आईसह चारही बाळांची प्रकृती उत्तम होती.  गाझियाबादच्या नेहरूनगरमधील यशोदा हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन करण्यात आलं होतं. या हॉस्पिटलमध्ये झालेलं अशा प्रकारचं हे पहिलंच ऑपरेशन असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पहिल्यापासून योग्य नियोजन, औषधोपचार आणि आहारामुळे ही अवघड शस्त्रक्रिया पार पडल्याचंही डॉक्टर म्हणाले होतं.

VIDEO - 5 वर्षे वेदना सहन केल्या, सिटी स्कॅन पाहून हादरलीच; महिलेच्या पोटात होतं...

जुळं, तिळं आणि चारपेक्षाही अधिक बाळं जन्माला आल्याची काही प्रकरणं आहे. कुणी पाच, कुणी 6 तर कुणी एकाच वेळी 9 बाळांना जन्म दिल्याचीही प्रकरणं याआधी चर्चेत आली होती.

First published:
top videos

    Tags: Baby died, Health, Lifestyle, Parents and child, Small baby