डॉ. गौरव गांधी
अहमदाबाद, 07 जून : डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी देवच. कित्येकांचे प्राण ते वाचवतात. असाच एक डॉक्टर ज्याने तब्बल 16 हजार रुग्णांचा जीव वाचवला. हृदयाची समस्या असलेल्या या रुग्णांची हार्ट सर्जरी करून त्यांना जीवनदान दिलं. पण दुर्दैव बघा. इतरांचं हृदय नीट करणारा हा डॉक्टर, ज्याचा त्याच्याच हृदयाने मात्र घात केला. एका प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्टचा हार्ट अटॅक नेच मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. गुजरातच्या जामनगरमधील ही धक्कादायक घटना. 41 वर्षीय हृदयरोगतज्ज्ञ डॉ.गौरव गांधी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या चाळीशीतच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांना मृत्यूने गाठलं. डॉ. गांधी हे एक प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 16,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जेव्हा डॉ. गौरव गांधींना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते त्यांच्या घरातून हॉस्पिटलसाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांना छातीत दुखू लागलं आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. तरुणांना Heart Attack, 5 महिन्यांतील धक्कादायक आकडेवारी समोर, तज्ञ काय म्हणताय? मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गांधी जामनगरच्या एमपी शाह मेडिकल कॉलेजमध्ये शिकले. जामनगरमधून एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अहमदाबादमधून डीएम कार्डिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून ते जामनगरमध्ये हृदय रुग्णांवर उपचार करत होते. आपल्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेमुळे त्यांनी अल्पावधीतच चांगलं नाव कमावले होतं. वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी त्यांना प्रजासत्ताक दिनी सन्मानितही करण्यात आलं होतं. त्यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 16,000 हून अधिक रुग्णांवर उपचार केल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. डॉ. गांधी स्वतः हार्ट अटॅकचं प्रमाण कमी करण्याच्या मोहिमेशी जोडलेले होते. याबाबत ते लोकांना जागरूक करत असत. सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये त्यांचे काही व्हिडीओही आहेत. Shocking! अवघ्या 13 वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; तुमच्या मुलांमध्ये तर नाहीत ना अशी लक्षणं 29 ऑक्टोबर 1982 रोजी जन्मलेले डॉ. गौरव गांधी मूळचे जामनगरचे रहिवासी. ते विवाहित आहेत. त्यांची पत्नी देवांशी तज्ज्ञ दंतचिकित्सक आहे. त्यांना दहा वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगाही आहे.