हैदराबाद, 01 एप्रिल : पूर्वी हार्ट अटॅक वयस्कर लोकांना यायचा. पण आता तरुणांनाही हार्ट येतो आहे. हार्ट अटॅकमुळे अचानक मृत्यू झाल्याची बरीच प्रकरणं गेल्या काही कालवधीत समोर आली आहेत. अशात आता तरुणांनंतर एका लहान मुलीलाही हार्ट अटॅक आल्याने खळबळ उडाली आहे. एका 13 वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. तेलंगणातील ही धक्कादायक घटना आहे.
हैदराबादच्या महबूबाबाद मारीपेडामधील अब्बैपलेम गावातील ही मुलगी, जिचं नाव बोडा श्रावंती असल्याचं सांगितलं जातं आहे. ती सहावीत होती. गुरुवारी रात्री तिला श्वास घ्यायला त्रास झाला. सामान्यपणे लहान मुलांना अशी समस्या होते, त्यामुळे पालकही फार गांभीर्याने घेत नाहीत. पण हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं, याचा कधी कुणी विचारही केला नसेल. तिची प्रकृती खूपच बिघडली म्हणून तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्यात आलं. पण त्याआधीच ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ती झोपली होती. रात्री 12 च्या सुमारास ती अचानक उठली. तिने आपल्या आजीला उठवलं. आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. छातीत दुखतं आहे, असं तिने सांगितलं. घऱच्यांना वाटलं की तिला गॅस किंवा काही सामान्य समस्या असेल. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच उपचार केले.
देशात अचानक हार्ट अटॅकमुळे मृत्यू का होत आहेत? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
पण तरी तिच्या छातीतील वेदना कमी झाल्या नाहीत उलट अधिक वाढल्या. तिची अवस्था पाहून सर्वजण घाबरले. तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेण्याची धडपड सुरू झाले. घरचे लोक ऑटोरिक्षा आणायला गेले. पण ऑटो येईपर्यंतच तिचा मृत्यू झाला. टीव्ही 9 हिंदीच्या वृत्तानुसार तिच्या काकांनी तिला सीपीआर दिला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्याचा काहीच फायदा झाला नाही.
महाराष्ट्रातही 15 वर्षांच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू
मार्च 2023 मध्ये महाराष्ट्रातही अशी घटना घडली होती. दहावी परीक्षेच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. बीडच्या पाटोदा शहरात ही धक्कादायक घटना घडली होती. सय्यद साद सय्यद कादर (15) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव.
हृदयविकाराच्या स्थितीत CPR ने कसा वाचवला जाऊ शकतो जीव? सर्वांना माहित असावी ही टेक्निक
सय्यदला क्रिकेटची आवड होती. बीड जिल्ह्यातून लहान मुलांच्या क्रिकेट संघात त्याची दोन महिन्यांपूर्वी निवड झाली होती. मुंबईत एका सामन्यात तो खेळत होता. 2 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत होत्या. त्याच्या दोन दिवस आधी तो पाटोदाला परतला. तो परीक्षेची तयारी करत होता. परीक्षेआधी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा जीव गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Children Day, Heart Attack, Lifestyle, Tamil nadu