प्रतिकात्मक फोटो
हैदराबाद, 29 एप्रिल : एक 45 वर्षांचा पुरुष रुग्ण पोटाची समस्या घेऊन डॉक्टरांकडे आला. डॉक्टरांनी त्याचे वैद्यकीय रिपोर्ट केले असता त्याच्या पोटात खडे असल्याचं समजलं. त्याला किडनी स्टोन झाला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्याच्या पोटातील स्टोन काढले. पण त्यांची संख्या आणि आकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. तेलंगणामधील हे प्रकरण आहे. रामागुंडमध्ये राहणारा हा रुग्ण सिकंदाराबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॉजी अँड युरोलॉजीमध्ये आला होता. त्याच्या उजव्या किडनीत स्टोन झाले होते. डॉक्टरांनी तब्बल 154 स्टोन त्याच्या किडनीतून बाहेर काढले. त्यापैकी सर्वात मोठा स्टोन अंदाजे 62 मिमी बाय 39 मिमी इतका आहे. जो किडनीत सर्वत्र पसरला होता.
AINU चे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. राघवेंद्र कुलकर्णी म्हणाले, “स्टॅगॉर्न कॅल्क्युली हे जटिल किडनी स्टोन आहेत, जे किडनीच्या बहुतेक भागात पसरतात. हे मुतखडे वारंवार मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रपिंडाला इजा अशा आजारांशी संबंधित आहेत. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांना डायलिसिसची गरज पडू शकते.स्टॅगहॉर्न कॅल्क्युली असलेल्या रुग्णांवरील उपचारही आव्हानात्मक असतात. विशेषतः तो रुग्ण मधुमेही असेल तर. पण प्रगत तंत्रज्ञानामुळे कमीत कमी धोक्यासह प्रभावी उपचार शक्य झाले आहेत, असंही डॉ. कुलकर्णी म्हणाले. OMG! 2 लिंगांसह जन्माला आलं बाळ, पण हा महत्त्वाचा बॉडी पार्ट गायब; डॉक्टरही शॉक या रुग्णावर एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रथम सर्वात मोठ्या किडनी स्टोनचे तुकडे केले गेले आणि त्यानंतर हे तुकडे काढण्यात आले. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले की, स्टोन पूर्णपणे साफ करण्यासाठी रुग्णावर मल्टी-ट्रॅक्ट पीसीएनएल करावं लागलं. जटिल किंवा मोठे किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी PCNL हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग. किडनी स्टोनसाठी PCNL ची सुरक्षितता आणि परिणामकारकता अनेक अभ्यासांनी सिद्ध केली आहे. किडनी स्टोन म्हणजे काय? तो का होतो? मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन ही एक सामान्य समस्या आहे. शरीरातील खनिजे आणि क्षार जेव्हा छोट्या छोट्या दगडाचे रूप धारण करतात तेव्हा त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. हे स्टोन सामान्यतः मुगाच्या दाण्याएवढे असतात. परंतु काहीवेळा ते वाटाण्यापेक्षाही मोठे असू शकतात. मृत्यूनंतर का उघडे राहतात डोळे? खरंच मृत व्यक्ती आपल्याला पाहते का? शरीरात पाण्याची कमतरता हे किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण आहे. व्हिटॅमिन-डी किंवा कॅल्शियमचा पर्याय दीर्घकाळ घेतल्यास शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो. लठ्ठपणा, शारीरिक हालचाल कमी होणे, उच्च रक्तदाब आणि शरीरातील कॅल्शियमचे शोषण कमी होणे यामुळेदेखील किडनी स्टोन होऊ शकतो. जास्त मीठ किंवा प्रथिनयुक्त पदार्थ जसे की मटण, चिकन, चीज, मासे, अंडी, दूध इत्यादी खाल्ल्यानेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.