तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचे डोळे उघडे राहतात आणि ते बंद केले जातात. डोळे उघडे असल्याने मृतदेह आपल्याकडे पाहतो असंच वाटतं.
वैद्यकीय माहितीनुसार मृत्यूनंतर दृदयाची धडधड, मेंदूचं कार्य थांबतं. शरीराची सिस्टम थांबते पण डोळे काम करत असतात. त्यामुळेच मृत्यूनंतर काही बदल अचानक दिसून येतात.
मृत्यूआधी कुणाचे डोळे उघडे राहिले की ते अशुभ मानलं जातं आणि लगेच त्याचे डोळे बंद केले जातात. पण याचा संबंध चांगल्या-वाईटाशी नाही.
आपल्या डोळ्यांच्या पापण्या केंद्रीय तंत्रिका तंत्राद्वारे नियंत्रित होतात. जिथून आपले डोळे बंद करण्याचे संकेत मेंदूला मिळतात. जेव्हा आपण जिंवत असतो तेव्हा ही प्रणाली चांगलं काम करते. त्यामुळे डोळ्यावर प्रकाश पडला, झोपताना आपण डोळे बंद करतो.
मृत्यूनंतर ही प्रणाली काम करणं बंद करते. त्यामुळे डोळ्यांवरील नियंत्रणही संपतं आणि पापण्या लगेच उघडतात.
आणखी एक कारण म्हणजे डोळं उघड-बंद करण्याचं काम डोळ्यांशी संबंधित मांसपेशी करतात. त्यासुद्धा मृत्यूनंतर मेंदू कार्य करणं थांबल्याने काम करणं बंद करतात.
मृत्यूनंतर 5 तास डोळे कार्य करतात. डोळे दान करायचे असतील तर या वेळेतच दान करायला हवेत नाहीतर त्यातील कॉर्निया धूसर पडतो आणि डोळे काम करणं बंद करतात.