JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking! ...अन् जिभेवरच उगवू लागले केस; विचित्र समस्येमुळे हैराण झाली महिला

Shocking! ...अन् जिभेवरच उगवू लागले केस; विचित्र समस्येमुळे हैराण झाली महिला

Hair on tongue : एका सर्जरीनंतर जिभेवर केस उगवण्याच्या विचित्र समस्येमुळे त्रस्त झाली महिला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 21 जानेवारी : आपल्या डोक्यावर आणि शरीराच्या काही भागावर केस हे असतात. पण शरीराचे असे काही भाग आहेत, जिथं केस कधीच येत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे जीभ. पण याच जिभेवर केस उगवू लागले असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल  (Hair Growing on Woman’s Tongue). किंबहुना तुमचा यावर विश्वासही बसणार नाही. पण एका महिलेच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडत आहे  (Weird Things About Human Body). अमेरिकेच्या कोलोराडे स्प्रिंग्समध्ये (Colorado Spring, America)  राहणारी 42 वर्षांची कॅमरून न्यूसम  (Cameron Newsom). काही वर्षांपूर्वी कॅमरूनला तिच्या जिभेवर खूप स्पॉट्स दिसले. तिने तात्काळ डॉक्टरांना दाखवलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला कॅन्सर असल्याचं सांगितलं. तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा ती 33 वर्षांची होती. तिला स्कॅमस सेल कार्सिनोम (squamous cell carcinom) हा दुर्मिळ कॅन्सर झाला होता. हा जिभेच्या त्वचेशीसंबंधित कॅन्सर  (Tongue Cancer)आहे. हे वाचा -  कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने बरा होतो कोरोना? उपायाबाबत डॉक्टर म्हणाले… कॅमरूनने सांगितलं, डॉक्टरांनी जेव्हा सुरुवातीला माझ्या जिभेवरील स्पॉट पाहिला, त्यानंतर जवळपास 3 वर्षांनंतर मला ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग असल्याचं समजलं. या कॅन्सरचं निदान व्हायला खूप वेळ लागला. जेव्हा मला जिभेत कॅन्सर आहे, असं समजलं तेव्हा मला कुणीतरी मृत्यूची शिक्षाच दिली असं वाटलं. पण याच्यासाठी लढायचंच असं मी ठरवलं. या कॅन्सरवर उपाय करण्यासाठी तिच्या जिभेचा एक भाग कापण्यात आला. त्यानंतर तिच्या पायातील टिश्यू काढून ते जिभेला लावण्यात आले.  स्कॅमसने कॅन्सरला तर हरवलं पण आता तिला विचित्र समस्येचा सामना करावा लागतो आहे. तिच्या जिभेवर केस उगवू लागले आहेत. जिभेला जिथे तिच्या पायाचे टिश्यू लावण्यात आले आहेत, तिथं हे केस येत आहेत. हे वाचा -  काहीही! तरुणीने सांगितलं आपल्या सौंदर्याचं सिक्रेट; फक्त वाचूनच उलटी येईल तिने सांगितलं, तिच्या जांघेतील त्वचेचे टिश्यू काढून ते जिभेत लावण्यात आले. या ऑपरेशनला तब्बल 9 तास लागले. आता फक्त जिभेचे टिश्यू जिथे आहेत, तिथूनच ती चव घेऊ शकते. जिथं पायाचे टिश्यू लावण्यात आले आहेत, तिथं केस उगवू लागले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या