मुंबई, 21 जानेवारी : कोरोनापासून बचावासाठी लोक काय काय नाही करत आहेत. काही लोक तर अगदी घरगुती उपायही करत आहेत. सोशल मीडियावर असे बरेच उपाय व्हायरल होत आहेत. बहुतेक लोक काढ्याचं सेवन करत आहेत. काही लोक तर असे विचित्र उपाय करत आहेत, ज्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कफ सिरपमध्ये शिजवलेलं चिकन
(Chicken Cooked In Cough Syrup).
बहुतेक लोक चिकन कफ सिरफ आणि दारूसोबत 30 मिनिटं शिजवत आहेत. टिकटॉकवर असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड असलेला हा व्हिडीओ खूप शेअर केला जातो आहे. असं चिकन खाल्ल्यानंतर चांगलीच झोप येते. चिकन खाल्ल्यानंतर उरलेलं सूप लोक सिरपासारखं पित आहेत. कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो, असा दावा केला जातो आहे.
डॉक्टरांनी मात्र या उपायाबाबत सावध केलं आहे. असं काही तुम्ही खाल्लं तर अन्न विषबाधा होऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार वेलनेस हॅक म्हणून हा उपाय शेअर केला जातो आहे. फॅमिली मेडिसीन नावाच्या संस्थेचे डॉ. आरोन हार्टमन यांनी हा ट्रेंड खूप खतरनाक असल्याचं म्हटलं आहे. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, असं त्यांनी सांगितलं.
हे वाचा - मुलांना शाळेत पाठवू की नको? पालक म्हणून तुमचा गोंधळ; आधी डॉक्टर काय म्हणाले पाहा
MIC.com ला दिलेल्या मुलाखतीत हार्टमन यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही कफ सिरपमध्ये पाणी, दारू टाकून चिकन शिजवाल तेव्हा मांसात ते खूप प्रमाणात असेल. असं नीट शिजलेलं चिकन तुम्ही खाल्लं तर तुम्ही निम्मी बाटली कफ सिरफ प्यायल्यासारखं आहे. हे खूप धोकादायक आहे. यामुळे सर्दी-खोकला जाणार नाहीच पण तुमचं पोट नक्कीच खराब होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.