भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी ठाणे, 22 जून : निसर्ग हा समृद्ध आहे. निसर्गातील प्रत्येक पान आणि फुल या ना त्या कारणाने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि भर पावसाळ्यात डोंगरात छोट्या रानभाज्या उगवतात. या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतात. या रानभाज्या करण्याची एक खासियत असते. यामधील शेवाळ्याची भाजी कशी करतात याची खास माहिती ठाण्यातल्या कोकणीपाडा या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या गुलाब कुरकुटे यांनी दिली. शेवळं ही भाजी पावसाळ्याच्या सुरवातीला मिळते. ही भाजी घशाला खवखवते त्यामुळे विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. शेवळांची भाजी किंवा वडीही बनवतात.अनवे, अमरकंद, आळंबी ,आघाडा, आचकंद, आलिंग, उळशाचा मोहर, कडकिंदा, कडूकंद, करटुली , कवदर, कवळी, काटे-माठ, कुड्याची फुले, कुर्डू, कुसरा, कुळू , कोंबडा, कोरड, कोलासने, कोवळे बांबू, कोळू, कौला, गेंठा असे रान भाज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत.
कशी करावी भाजी? शेवळ्याची भाजी जंगलातून तोडून आणल्यानंतर ती स्वच्छ धुवावी. त्यानंतर ती भाजी कापताना त्यांच्या कोवळ्या दांडीला असलेले साल काढावे. भाजी कापून झाल्यानंतर भाजी घशाला खाजू नये यासाठी त्यात काकडाचे फळ किंवा बोंडारा कापून टाकावा जेणे करून ही भाजी खाजणार नाही. त्यानंतर भाजीमध्ये पाणी टाकून ती भाजी कुकरमध्ये शिजवण्यास लावावी. भाजीपाल्याचे दर गगनाला का भिडले? काय आहे कारण? PHOTOS पाच शिट्या घेतल्यानंतर त्यात तिखट , मीठ, गरम मसाला, हळद आणि हिरवे वाटण घालून रवीने घोटून घ्यावी. त्यांनतर पातेल्यात तेल घालून लसूण , कडीपत्ता, राई, जिऱ्याची फोडणी द्यावी. त्यामध्ये शिजलेली आणि मसाले एकत्र केलेली भाजी टाकावी. उकळी आल्यानंतर त्यात चिंच कोळून टाकावी. हिरवे वाटण करण्यासाठी आलं, कोथिंबीर, लसून, मिरची आणि खोबरं वापरावे. भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेट सारखे अनेक घटक असतात असं गुलाब यांनी सांगितलं. बटण पापडी आणि दाल चाट, सिंधी पदार्थ खाल्ला का कधी? पाहा Video आदिवासी लोकांना ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे.. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवितात. भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजी हे पदार्थ केले जातात, असं गुलाब यांनी स्पष्ट केलं.