भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी उल्हासनगर 17 जून : मुंबईजवळ वसलेलं उल्हासनगर हे एक वैशिष्ट्यपूर्ण शहर आहे. देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या सिंधी समाजानं इथं मोठ्या प्रमाणात वस्ती केली. उद्योगप्रिय असलेल्या या समाजानं शहराला ओळख दिली. उल्हासनगरची बाजारपेठ चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथील खाद्यसंस्कृतीमध्येही विविधता आहे. उल्हासनगरमध्ये मिळणारे बटण पापडी आणि डाल सँडविच हे पदार्थ चांगलेच फेमस आहेत. काय आहे वैशिष्ट्य? तुम्ही पाणी पुरी, शेव पुरी , रगडा पॅटीस हे चाटचे प्रकार नक्कीच खाल्ले असतील. या पदार्थांच्या यादीत बटण पापडी चाटचा सहज समावेश होईल. गोल गोल बटरचे मधून तीन अर्धे तुकडे करायचे. त्यानंतर मस्त तिखट पण्यात बुडवायचे. थोडा उकडलेला बटाटा टाकायचं. त्यावर चटणी, पाणी पुरीचे पाणी, आंबट गोड चिंचेची चटणी फरसाण आणि कांदा टाकून दिलेली ही प्लेट दिसायलाच इतकी सुंदर दिसते की कधी एकदा आपण ती खातोय असे होऊन जाते. हा बटण पापडी चाट भन्नाट लागतो हे जिभेला आणि पोटाला खाल्ल्यानंतर समजते. केवळ 30 रुपयाला मिळणारी ही एक प्लेट खवय्यांचे पोट नक्कीच भरवते.
बटण पापडी खाल्ल्यानंतर आपले मन भरत नाही तोच डाळ शिजवल्याचा सुवास येतो आणि आपली नजर समोरच मोठ्या पातेल्यात बनवून ठेवलेल्या डाळीकडे जाते. बाजूलाच पावही असतात. हे पाव कापून त्यात सँडविच बनवणे हे तर नित्याचेच. पण पावात सँडविच बनवून त्यावर डाळ , फरसाण , आणि चटणी टाकली की जीभ पुन्हा एकदा वेगळा पदार्थ खण्यासाठी सज्ज होते. आणि अजूनही थोडी पोटात जागा शिल्लक आहे असे वाटू लागते. हा पदार्थ देखील फार महाग नाही 40 रुपयाला हे सगळे पदार्थ मिळतात. हात न लावता भरणार पाणीपुरी, ठाणेकराने आणलं सेन्सर पाणीपुरी मशीन, अशी तयार होते प्लेट! VIDEO उल्हासनगरमधील रतन दाल पापडी यांच्या ठेल्यावर हे पदार्थ मिळतात. येथील पदार्थांची चव सिंधी खाद्य संस्कृतीची आठवण करून देणारी आहे. रतन चाचा गेली 30 वर्ष हा स्टॉल चालवतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथील चवीत कोणताही बदल नसल्याचं ग्राहक सांगतात. त्यामुळे रोज संध्याकाळी इथं मोठी गर्दी असते. कुठे आणि कधी खाणार? उल्हासनगर महापालिकेच्या समोर, उल्हासनगर 3 रोज संध्याकाळी 5 ते 9