JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Solapur News : सोलापूरची पाव चटणी लय फेमस, 61 वर्षांपासून टेस्ट जशीच्या तशीच, पाहा VIDEO

Solapur News : सोलापूरची पाव चटणी लय फेमस, 61 वर्षांपासून टेस्ट जशीच्या तशीच, पाहा VIDEO

Solapur News : सोलापूरची हायनाळकर पाव चटणी ही डिश गेल्या 61 वर्षांपासून फेमस आहे. त्यामुळे ही पाव चटणी खाण्यासाठी खवय्यांची या ठिकाणी गर्दी होत असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 2 मे : प्रत्येक शहरात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळत असतात. सोलापूर शहरातर अनेक खाद्यपदार्थ फेमस आहेत. वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदत असलेल्या या शहराची खाद्यसंस्कृतीही श्रीमंत आहे. सोलापूरची हायनाळकर पाव चटणी ही डिश गेल्या 61  वर्षांपासून फेमस आहे. त्यामुळे ही पाव चटणी खाण्यासाठी खवय्यांची या ठिकाणी गर्दी होत असते.    कधी झाली सुरुवात? 1962 मध्ये सीताराम यांच्या आजोबांनी हॉटेल हायनाळकर यांची सुरुवात सोलापूरमध्ये केली. त्यांनी या ठिकाणी पाव चटणी हा पदार्थ विकायला सुरुवात केली. सध्या या हॉटेलचा कारभार सीताराम आणि सोपान हे दोघे बंधू सांभाळतात. त्यांनी 1962 ला जशी पाव चटणीची टेस्ट होतीच तशीच चव आजही टिकवून ठेवली आहे. त्यामुळे ही पाव चटणी खवय्यांच्या चांगलीच पसंतीस पडते.  

Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!

बनवली कशी जाते? -प्रथम दोन ब्रेडचे स्लाईस घेतले जातात. - त्यानंतर ते एकसमान कट केले जातात. - एका प्लेटमध्ये ते ब्रेडचे कट घेऊन त्यावर स्पेशल चटणी टाकली जाते . - आपल्या पसंतीनुसार ज्यांना शेव पाहिजे त्यांना शेव आणि ज्यांना खारा पाहिजे त्यांना खारा टाकुन त्यावर कांदा फिरवुन सर्व्ह केली जाते. विद्यार्थ्यांचे आवडीचे ठिकाण दयानंद कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे हे आवडीचे ठिकाण आहे. शिक्षणासाठी या परिसरात राहणारे विद्यार्थी या ठिकाणी पाव चटणी खाण्यासाठी येत असतात. पुण्या-मुंबईत स्थायिक झालेल्या बहुतांश सोलापूरकरांचं शिक्षण दयानंद कॉलेजमध्येच झालेलं आहे. या विद्यार्थ्यांनी आवडीची डिश म्हणून आमच्या या डिशला प्रसिद्धी दिली. सध्या महागाई वाढल्या असल्याने एक प्लेट आम्ही 30 रुपयाला देतो. आमचे अनेक जुने ग्राहक अजूनही आम्हाला सांगतात की चव मध्ये कोणताच बदल झाला नाही. तीच गोष्ट आमच्यासाठी समाधानाची आहे, असं हॉटेल मालक सीताराम हायनाळकर यांनी सांगितले.

Video : ज्वारीपासून फक्त भाकरीच नाही तर केकही बनवा! सोलापूरच्या महिलांचा यशस्वी प्रयोग

पाव चटणी आवडीने खातो मी गेल्या 30 वर्षांपासून ही पाव चटणी खातो. स्वच्छता आणि क्वालिटी ही इथेच मिळते. शिवाय आमच्या खिशाला परवडणारा दर असल्याने मी दक्षिण सोलापूर तालुक्यातून सोलापुरात कामाला येतो तरीही ही पाव चटणी आवडीने खातो, असं ग्राहक दादा सलग यांनी सांगितले.   कुठे आहे हॉटेल? MWP7+MF2, भवानी पेठ, सोलापूर, महाराष्ट्र  

 <span style=“font-family: ‘” sans-serif"’;"=""> संपर्क -  <span class="" s2""=""><span style=“font-family: ‘” sans-serif"’;"="">90284 04347

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या