सोलापूर 23 फेब्रुवारी : संपूर्ण देशात सोलापूर जिल्हा हे ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. आजवर ज्वारी म्हंटलं की तुम्ही ज्वारीची साधी भाकरी किंवा कडक भाकरीच खाल्ली असेल. पण, ज्वारीपासून केकही बनवता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? सोलापूरच्या यशस्विनी अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीनं हे सिद्ध करून दाखवलंय. कशी झाली सुरूवात? आजच्या तरूणाईमध्ये फास्ट फुड हा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे शरिराला हानीकारक अशा पदार्थांचं सेवन तरुण-तरुणी करतात. पण, शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्व आणि इतर गोष्टी मिळाव्यात या हेतूनं अनिता माळगे यांनी या कंपनीची स्थापना केली आहे. सोलापूर जिल्हा ज्वारी आणि बाजरीच्या उत्पादनात आघाडीवर आहे. यावर प्रक्रिया करून 12 प्रकारचे ज्वारीचे बिस्कीट आणि कुकीजची निर्मिती त्यांनी केलीय. त्याचप्रमाणे केक, लाह्या, पोहे, रवा, चकली, लाडू शेवया, पापड, सांडगे या पदार्थाचीही उत्पादन केलंय. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या कडक भाकरी आणि शेंगाच्या चटणीची या प्रदर्शनात विक्री केली जाते. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर सुरू केला भन्नाट कॅफे, लाडू-रसमलाई मिल्कशेकनं लावलंय सर्वांना वेड, Video आजवर देशातील अनेक राज्यात हे ज्वारीपासून बनवलेले उत्पादन विक्रीस उपलब्ध केले जाते तसेच बोरामणी या छोट्याशा गावात सध्या महिलांना रोजगाराची मोठी संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. शेतीमालाला सध्या चांगला भाव मिळेलच याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. पण, अनिता माळगे आणि गावातील इतर महिलांनी केलेल्या कामाची दखल देशपातळीवर घेण्यात आली आहे.
ज्वारीपासून आपण अनेक बिस्किट किंवा इतर पदार्थ बनवू शकतो. हैदराबाद आणि राज्यातील अनेक कृषी विद्यापीठांनी आम्हाला या सर्व गोष्टींसाठी मार्गदर्शन केले. आज बाजारात मिळणाऱ्या मैदा पासून बनलेल्या पदार्थांपेक्षा कमी किमतीत आम्ही हे ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलं आहे. शरीराला आवश्यक असणाऱ्या पौष्टिक मूल्यांचा यात समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती अनिता माळगे यांनी दिली. कुठे करणार ऑर्डर? तुम्हाला येथील पदार्थांची ऑर्डर करायची असल्यास 95854800 या नंबरवर व्हॉट्सअप करावे.

)







