मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!

Video: सोलापूर जिल्ह्यातील सर्वात फेमस भेळ, एकाच प्लेटमध्ये भरतं पोट!

X
Solapur

Solapur News : मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील एक प्लेट भेळमध्येच भूक भागते.

Solapur News : मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथील एक प्लेट भेळमध्येच भूक भागते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापूर 15 मार्च : खाद्यसंस्कृतीचा वारसा जपणारे शहर म्हणून सोलापूरची ओळख आहे. शहरातल्या मटन शिकनं तर देशभरातील खवय्यांना भूरळ घातली आहे. सोलापूर शहराप्रमाणेच जिल्ह्यातलेही अनेक पदार्थ फेमस आहेत. सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहोळमधील भेळ चांगलीच फेमस आहे. या एकाच भेळमध्ये दिवसभराची भूक भागते. चवदार आणि पोटभर असलेली ही भेळ खाण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून इथं नेहमी गर्दी असते.

    काय आहे वैशिष्ट्य?

    मोहोळ रेल्वे स्टेशनची भेळ म्हणून ही संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. सुरूवातीला आठ रुपयांना मिळणाऱ्या या भेळेची आता 30 रुपये किंमत झालीय. गोड भेळ, ओली गोड भेळ, सुखी गोड भेळ आणि तिखट सुखी भेळ असे चार प्रकार इथं मिळतात. संजय देशमुख हे या स्टॉलचे मालक असून त्यांनी गेल्या 16 वर्षांपासून उत्तम चवीची परंपरा जपली आहे.

    Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!

    भेळसाठी लागणारे फरसाण आणि इतर गोष्टी ते उत्तम क्वालिटीचे वापरतात. त्याचबरोबर त्यांच्या स्टॉलवर मिळणारी चटणी हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. उत्तम रिफाईंड ऑईलमध्ये ते हे चटणी बनवतात. तिखट आणि मिठाचं योग्य प्रमाण असल्यानं ही चटणी चांगलीच चविष्ट बनते. या भेळवर ते अनलिमिटेड कांदा आणि काकडी ते ग्राहकांना देतात.

    ही भेळ खाण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून इथं नेहमी गर्दी असते. जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंडळी इथून भेळचं पार्सल घेऊन जातात. दररोज साधरण 500 प्लेटची विक्री होते. त्यामधून संजय दिवसाला बार ते पंधरा हजारांची कमाई करतात.

    मी गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून ही भेळ खाण्यासाठी खास पेनूर गावातून  इथं येतो. मी पैलवान आहे. उत्तम क्वालिटी असलेली ही चवदार भेळ मला आवडते. क्वांन्टिटीच्या हिशेबानं याची किंमतही कमी आहे, अशी प्रतिक्रिया येथील नियमित ग्राहक रजनीकांत चावरे यांनी दिली.

    First published:

    Tags: Local Food, Local18, Solapur