JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Kolhapur News : कोल्हापूरकरानं 15 फूट झाडच आणलं उचलून, ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट

Kolhapur News : कोल्हापूरकरानं 15 फूट झाडच आणलं उचलून, ‘या’ वडापावची आहे ‘नाद खुळा’ गोष्ट

कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या झाडाखालच्या वडापावची गोष्ट एकदम हटके आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 30 जून : एखाद्या खाद्यपदार्थाच्या ठिकाणाला त्याच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या गोष्टीमुळे विशेष ओळख मिळत असते.  कोल्हापुरातील एका हॉटेलला एका झाडामुळे नवी ओळख मिळाली होती. गेल्या 50 वर्षांपासून त्यांची ही ओळख कायम आहे. ही ओळख जपण्यासाठी त्यांनी एक अफाट काम केलंय. ते समजल्यानंतर तुम्ही नक्कीच कोल्हापूरकर ‘लय भारी’ असं नक्की म्हणाल. झाडासाठी वाट्टेल ते… कोल्हापुरात रुईकर कॉलनीजवळ झाडाखालचा वडापाव मिळतो. आता हे मोठे हॉटेल झालंय.  इथं यापूर्वी फक्त वडापावची एक छोटी गाडी होती. साकीब कोण्णूर हे या हॉटेलचे मालक असून ते त्यांचा भाऊ आणि मामासह हॉटेल चालवताक. साकीब यांच्या आजोबांनी 1972 साली वडाच्या झाडाखाली चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी त्यासोबत वडा देखील विकायला सुरूवात केली.

पहिल्याच दिवसापासून ग्राहकांना या वडापावची चव आवडू लागल्याने ग्राहक येथे गर्दी करू लागले. मात्र या गाड्याला काही नाव नसल्यामुळे ग्राहकांना पत्ता सांगताना हे ‘झाडाखालचा वडापाव’ असे नाव प्रचलित झाल्याचे साकिब कोण्णूर यांनी सांगितले. झाडाखालचा वडापाव हा गाडा येथे मिळणाऱ्या वडापावच्या चवीमुळे कोल्हापूरात फेमस झाला. पण अतिक्रमणाच्या कारणामुळे त्यांना हा गाडा हलवावा लागला. 2003 साली नवीन जागी हा गाडा सुरू झाला. त्यावेळी  वडाच्या झाडामुळे आपल्याला नाव मिळाले, ते झाड देखील आपल्या सोबत हवे असे साकिब यांच्या आजोबांना वाटू लागले. त्यामुळे पूर्वीच्या ठिकाणी जवळपास 10 ते 15 फूट उंच वाढलेले वडाचे झाड मशिनच्या साहाय्याने काढून त्याचे नवीन गाड्या शेजारी पुनर्रोपण करण्यात आले आहे. आज त्या झाडाचा एक डेरेदार वृक्ष बनला आहे. तात्या विंचू, कुबड्या खविस… मराठी व्हिलनला खायला ‘इथं’ होते गर्दी, पाहा काय आहे प्रकार ‘ज्या झाडामुळे आम्हाला नाव मिळाले. आमची ओळख निर्माण झाली त्या झाडाची आम्ही रोज काळजी घेतो.  या झाडामुळे  सकारात्मक भावना निर्माण होतात असे आम्ही मानतो. आम्ही अगदी मनापासून झाडाची निगा राखतो, ‘अशा भावना साकिब यांनी व्यक्त केल्या आहेत. आजही तीच चव.. सध्या झाडाखालच्या वडापाव या ठिकाणाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र चवीतील सातत्यामुळे या ठिकाणच्या वडापावने ग्राहकांची मने जिंकली आहेत. येथील वडापाव बनवण्याची कृती ही सामान्यच असली तरी, येथे वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळेच तो चविष्ट बनतो. यामध्ये राजवाडी डाळीचे बेसन, इंदौरमधील उत्कृष्ट दर्जाचा बटाटा आणि मसाला वापरला जातो. हा वडापाव खाण्यासाठी कोल्हापूरसह शेजारच्या गावातील खवय्ये देखील येतात. त्या जोरावरच साकिब यांनी याच नावाचं हॉटेल सुरू केलंय. हा तर जम्बो किंगचा बाप; तरुणाने तयार केला तब्बल अडीच किलोचा वडापाव! कुठे खाणार? झाडाखालचा वडापाव, एस एम घाटगे हिरो शोरुम समोर, रुईकर कॉलनी, कोल्हापूर मुख्य बस स्थानक-तावडे हॉटेल रोड, कोल्हापूर - 416005 वेळ : सकाळी 7.30 ते संध्याकाळी 7.30

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या