खरेदी करताना चांगलं मशरूम ओळखणं आवश्यक असतं. त्यासाठी त्याच्या वरचा भाग तपासून घ्यावा.
अनुप पासवान, प्रतिनिधी कोरबा, 14 जुलै : पावसाळ्यात बाजारपेठेत विशेष फळं आणि भाज्या पाहायला मिळतात. मशरूमही त्यापैकीच एक. पाऊस सुरू झाला की, आपण मशरूम अगदी आवडीने खातो. मात्र जरा थांबा. हे मशरूम आपल्या जीवावर तर बेतणार नाहीत ना, याचा विचार करा. कारण काही मशरूम जंगलात उगवलेले असतात, जे खाऊन आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया, ताजे, चांगले मशरूम नेमके ओळखायचे कसे. डॉक्टर प्रितेश मशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगलात आढळणारे मशरूम बऱ्याचदा आरोग्यासाठी हानीकारक ठरतात. म्हणूनच मशरूम खरेदी अत्यंत निवडक पद्धतीने करायला हवी. पावसाळ्यात विविध विषारी प्राणी बिळांबाहेर येतात. कदाचित या प्राण्यांचा स्पर्श जमिनीत उगवणाऱ्या मशरूमला झालेला असू शकतो किंवा मशरूम बिळांजवळ वाढलेलं असू शकतं. यापैकी कोणतीही शक्यता आपल्याला महागात पडू शकते. म्हणूनच खरेदी करताना चांगलं मशरूम ओळखणं आवश्यक असतं.
मशरूम साधारणतः पांढऱ्या रंगाचे असतात. खरेदी करताना मशरूमच्या वरचा भाग तपासून घ्यायला हवा. त्यावर लहान लहान डाग दिसल्यास ते खरेदी करू नये. तसेच त्यावर काळ्या डागांसह काहीशी बुरशी दिसली, तरीही ते खरेदी करणं टाळावं. मशरूममधून कोणताही उग्र वास आला किंवा गोड वास आला तरी ते खरेदी करू नये. क्या बात है! चहा प्या आणि कपही खा; पठ्ठ्याने शोधली फक्कड आयडिया लक्षात घ्या, मशरूम शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात, मात्र त्यांची निवड चुकल्यास ते विषारी ठरू शकतात. मशरूम खाल्ल्याने रुग्णालयात दाखल होण्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातून असं प्रकरण समोर आलं होतं.