आदित्य तिवारी, प्रतिनिधी भोपाळ, 12 जुलै : कधीकधी आपल्या घरी एखादा पदार्थ इतका स्वादिष्ट झालेला असतो की, तो खाल्ल्यावर ताटही चाटून-पुसून खावंसं वाटतं. परंतु तसं आपण करू शकत नाही. यावरच एका चहा विक्रेत्याने एक फक्कड कल्पना शोधून काढलीये. त्यानुसार, आता आपल्याला चहा प्यायल्यावर कपही आवडीने खाता येईल. मात्र हे सगळीकडे होणार नाही हं, तर केवळ त्याच्याच दुकानात हा अनुभव घेता येईल. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये हे दुकान आहे. जिथे चॉकलेट, बटरस्कॉच अशा आईस्क्रीम फ्लेव्हरच्या कपांमधून चहा मिळतो. हे कप काहीसे आईस्क्रीम कोनसारखे असतात, तर काहीसे बिस्कीटसारखे असतात. त्यामुळे चहा पिता पिता तुम्ही कपही खाऊ शकता.
हे कप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दुकानदाराच्या या कल्पनेचं सर्वत्र कौतुक होतंय. परिणामी दुकानातली गर्दीही वाढतेय. इंटरनेटवर व्हिडिओ पाहून इंटरनेटवरच दुकानाचा शोध लावून दूरदूरचे लोक इथे चहाचा आस्वाद घ्यायला दाखल होत आहेत. दुकानाबाहेर लहान मुलांसह वृद्ध ग्राहकांच्याही रांगा पाहायला मिळतात. मराठमोळ्या अभिनेत्याने 57 व्या वर्षी केलं सहाव्या गर्लफ्रेंडशी लग्न; पत्नी आहे 25 वर्षांनी लहान PHOTOS विशेष म्हणजे प्लॅस्टिकवर उपाय म्हणून या दुकानदाराने हा पर्याय शोधून काढला. ‘कोणत्याही प्रकारचा कप असूद्या, मात्र तो कुठे फेकावा लागू नये आणि ग्राहकांना इतर दुकानांमध्ये मिळणाऱ्या चहापेक्षा इथे वेगळेपण जाणवायला हवं यादृष्टीने ही कल्पना सुचली’, असं या दुकानदाराने सांगितलं.