चॅनेल, लुईस व्ह्युटॉन, प्राडा, हर्मेज अशा ब्रँडेड डिझायनर पर्स काही हजारांपासून ते काही लाख किंवा कोटी रुपयांमध्ये मिळतात.
मुंबई, 7 जून : जगभरात फॅशन आणि अॅक्सेसरीजचं एक मोठं मार्केट आहे. कपड्यांपासून ते चप्पल-बूट, गॉगल, हँडबॅग्ज, परफ्युम अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो. जगभरातले नामांकित ब्रँड्स सतत त्यात नावीन्याची भर घालत असतात. लुईस व्हृयुटॉन, चॅनेल, प्राडा हे यापैकीच काही डिझायनर हँडबॅगचे ब्रँड्स आहेत. यांच्या बॅग्ज आकर्षक पण प्रचंड महाग असतात. त्यामागचं नेमकं कारण काय, याबाबत ‘डीएनए’ने वृत्त दिलं आहे. लक्झरी आणि डिझायनर वस्तू वापरणं ही सर्वसामान्यांसाठी चैन असली, तरी जगातले अनेक लोक याकडे स्टाईल स्टेटमेंट म्हणून पाहतात. स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी ते सतत काहीतरी वेगळं शोधत असतात. त्यासाठी भरपूर खर्चही करतात. अशा लोकांसाठी लक्झरी ब्रँड्स अनोख्या फॅशन अॅक्सेसरीज लाँच करत असतात. त्यांना मागणीही भरपूर असते.
World Poha Day : दास्तान-ए-पोहा..! महाराष्ट्र की इंदूर, तुम्हाला कोणते पोहे आवडतात?डिझायनर हँडबॅग्जची आवड बरेचदा खर्चिक ठरते. चॅनेल, लुईस व्ह्युटॉन, प्राडा, हर्मेज अशा ब्रँडेड डिझायनर पर्स काही हजारांपासून ते काही लाख किंवा कोटी रुपयांमध्ये मिळतात. हे जगातले सर्वांत महागडे ब्रँड्ज आहेत. त्याचं कारण त्या केवळ बॅग नसून, कलात्मक वस्तू असतात. प्रत्येक पीस वेगळा व कौशल्यपूर्ण पद्धतीनं तयार केलेला असतो. त्यामुळे त्यांची किंमत खूप जास्त असते. उदा. लुईस व्ह्युटॉनची एखादी लिमिटेड एडिशन डिझायनर हँडबॅग 7,500 डॉलरना विकली जाण्यामागे नेमकं काय कारण असू शकतं, लोकंही त्यासाठी इतका खर्च का करतात हे जाणून घेतलं पाहिजे.
ब्रँडचं नाव आणि वेगळेपणा जगभरातले लक्झरी ब्रँड्स अनेक दशकांपासून या व्यवसायात आहेत. त्यांना नाव आणि दर्जा कमावण्यासाठी बराच कालावधी घालवावा लागला आहे. त्यांची उत्पादनं प्रतिष्ठेशी जोडली जातात. त्यांना मिळत असलेल्या मागणीमुळेही त्यांना किंमत वाढवण्याची संधी मिळते. कलाकुसर व साहित्याचा दर्जा डिझायनर बॅग्जसाठी उच्च दर्जाचा कच्चा माल वापरला जातो. तसंच या बॅग्जवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली असते. अनेक कलाकार त्यांचा भरपूर वेळ त्यावर खर्च करतात. त्यासाठी विशेष कष्ट घेतात. या बॅग्जची शिवण, त्यावरची कलाकुसर यांचा दर्जा उत्तम असतो. या सगळ्यामुळे त्या अधिक टिकाऊ तर होतातच; पण महागही होतात. मर्यादित उत्पादन सगळेच लक्झरी ब्रँड्स त्यांच्या वस्तूंचं मर्यादित उत्पादन करतात. यामुळे त्यांचं वेगळेपण अधोरेखित होतं. मर्यादित असल्यामुळे त्यांचा पुरवठा कमी असतो. यामुळे मागणी जास्त असल्याची जाणीव राहते व किंमतही वाढते. डिझाईन व नावीन्य आपलं उत्पादन वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण असेल याकडे हे ब्रँड्स लक्ष देतात. बॅगचे आकार, पॅटर्न्स, डिझाईन, त्यावरची कलाकुसर या सगळ्यामध्ये नावीन्य असावं याकरिता त्यांची एक क्रिएटिव्ह टीम सतत काम करत असते. त्याकरता संशोधन करत असते. यामुळेही या बॅग्जची किंमत वाढते.
World Food Safety Day 2023 : मीठपासून ते वाईनपर्यंत… ‘हे’ पदार्थ कधीही होत नाहीत खराबमार्केटिंग-ब्रँडिंग - भरपूर पैसा, कष्ट व वेळ देऊन तयार केलेल्या उत्पादनांचं उत्तम मार्केटिंग व ब्रँडिंग करण्यासाठी कंपन्या खर्च करतात. यातून कंपनीची प्रतिमा तयार होत असते. - अॅड कॅम्पेन्स, सेलिब्रेटींची निवड, फॅशन शो यावर पैसे खर्च केल्यामुळे बॅग्जच्या किमतींत वाढ होते. - डिझायनर बॅग्जचं कौशल्यपूर्ण उत्पादन व त्यातील नावीन्य त्यांची किंमत वाढवण्यास कारणीभूत ठरतं.