JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weight loss tips : या वेळेला खाल तर घटेल वजन; स्लीम ट्रिम होण्याचा सोपा फंडा

Weight loss tips : या वेळेला खाल तर घटेल वजन; स्लीम ट्रिम होण्याचा सोपा फंडा

वजन घटवण्यासाठी काय खावं आणि काय खाऊ नये यासोबत कधी खावं हेसुद्धा महत्त्वाचं आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य - Canva

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 नोव्हेंबर : आपण स्लीम ट्रिम किंवा सडपातळ असावं असं प्रत्येक तरुणीला वाटतं. फक्त तरुणीच नाही तर तरुणांनाही परफेक्ट बॉडी हवी असते. पोटाची वाढलेली ढेरी तशी कुणालाच आवडत नाही. मग वजन घटवण्यासाठी (Weight loss tips) एक्सरसाइझ (Excercise tips), डाएट (Diet tips) याची मदत घेतली जाते. वजन घटवण्यासाठी काही पदार्थ खाल्ले जातात तर काही पदार्थ टाळले जातात. पण वेट लॉससाठी काय खावं आणि काय नको यासोबतच खाण्याची वेळही महत्त्वाची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या वेळाही बदलल्या आहेत. बरेच लोक ब्रेकफास्ट करणं टाळतात किंवा ब्रेकफास्ट उशिरा होतो आणि मग दुपारचं जेवण टाळलं जातं. रात्रीच जेवणही खूप उशिरा केलं जातं. पण तुम्ही वजन घटवण्याचा विचार करत असाल तर योग्य वेळी खाणं गरजेचं आहे. कोणत्या वेळी काय खावं याबाबत डॉ. स्नेहल अडसूळ यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी ब्रेकफास्ट, दुपारचं जेवणं आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ सांगितली आहे.

संबंधित बातम्या

⁣⁣⁣⁣⁣⁣ब्रेकफास्ट सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकफास्ट केला नाही तर दिवसभरात तुम्ही अतिरिक्त 500 कॅलरीज घेता. ब्रेकफास्टची योग्य वेळ ही 7 ते 8 आहे. सकाळी दहानंतर ब्रेकफास्ट बिलकुक करू नका. हे वाचा -  वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या ‘लो बजेट’ गोष्टी येतील कामी दुपारचं जेवण ब्रेकफास्ट केल्यानंतर 3 ते 4 तासांनी दुपारचं जेवण घ्यावं. यामुळे भूक आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दुपारी 12.30 ते 2.30 ही लंचची योग्य वेळ आहे. दुपारी चार वाजल्यानंतर जेवण करणं टाळा. रात्रीचं जेवण लंचनंतर तीन ते चार तासांनी आणि झोपण्याच्या तीन तास आधी डिनर करणं उत्तम. यामुळे आवश्यक तितक्या कॅलरीज वापरल्या जातात आणि झोपही शांत लागते. सायंकाळी 7 ते रात्री 9 ही डिनरची योग्य वेळ आहे. रात्री 10 नंतर जेवण करू नका. हे वाचा -  कॉफी पिण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष समोर तुम्हाला जर वजन घटवायचं असेल तर तुमच्या या आहाराच्या मध्ये छोटासा मध्यान्ह आहार म्हणजे मिड मिल घ्या. सकाळी 10-11.30 आणि संध्याकाळी 4-5.30 या वेळेत शक्यतो मिड मिल घ्यायला हवं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या