मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कॉफी पिण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष आले समोर

कॉफी पिण्याचे फायदे-तोटे माहीत आहेत का? संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष आले समोर

कॉफी हे जगभरातील सर्वात सामान्य पेयांपैकी एक आहे, परंतु त्याचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांबद्दल अनेक मत-मतांतरं आहेत. आत्तापर्यंतच्या बहुतांश संशोधनांमध्ये कॉफीच्या दीर्घकालीन परिणामाबाबत अनेक निरीक्षणात्मक अभ्यास करण्यात आले आहेत.

कॉफी हे जगभरातील सर्वात सामान्य पेयांपैकी एक आहे, परंतु त्याचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांबद्दल अनेक मत-मतांतरं आहेत. आत्तापर्यंतच्या बहुतांश संशोधनांमध्ये कॉफीच्या दीर्घकालीन परिणामाबाबत अनेक निरीक्षणात्मक अभ्यास करण्यात आले आहेत.

कॉफी हे जगभरातील सर्वात सामान्य पेयांपैकी एक आहे, परंतु त्याचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांबद्दल अनेक मत-मतांतरं आहेत. आत्तापर्यंतच्या बहुतांश संशोधनांमध्ये कॉफीच्या दीर्घकालीन परिणामाबाबत अनेक निरीक्षणात्मक अभ्यास करण्यात आले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर: कॉफी पिण्याचे अनेक फायदे आणि तोटे नेहमीच राहिले आहेत. अशा परिस्थितीत हे कॅफीनयुक्त (Caffeine) पेय प्यावं की नाही, हे ठरवणं कठीण आहे. आता एका नव्या संशोधनात असं आढळून आलंय की, कॉफी पिण्याबाबत काळजी घेणं अत्यंत आवश्यक (Benefits And Side Effects Of Coffee) आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (American Heart Association) 13-15 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या सायंटिफिक सेशन्स 2021 मध्ये (Scientific Sessions 2021) सादर केलेल्या या नवीन अभ्यासाचे निष्कर्ष समोर आलेत. यात असं सुचवलंय की, कॉफी प्यायल्यानं एका बाजूला हृदयाची धडधड सामान्यपेक्षा वाढू शकते. यामुळं शारीरिक हालचाली वाढते आणि यासोबतच झोपेचा कालावधीही कमी होतो. याचा अर्थ कॉफीच्या सेवनात संतुलन आणि सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, सॅन फ्रान्सिस्को (University of California, San Francisco) येथील संशोधक कार्डिओलॉजिस्ट ग्रेगरी मार्कस म्हणतात, "कॉफी हे जगभरातील सर्वात सामान्य पेयांपैकी एक आहे, परंतु त्याचा आरोग्यावर होणार्‍या परिणामांबद्दल अनेक मत-मतांतरं आहेत." आत्तापर्यंतच्या बहुतांश संशोधनांमध्ये कॉफीच्या दीर्घकालीन परिणामाबाबत अनेक निरीक्षणात्मक अभ्यास करण्यात आले आहेत. परंतु या अभ्यासात प्रथमच रिअल-टाइम प्रभावाचं मूल्यांकन केलं गेलंय. अभ्यास कसा झाला? ग्रेगरी मार्कस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 100 व्हॉलेंटिअर्सच्या हृदयाचे ठोके ट्रॅक करण्यासाठी त्यांना सतत ईसीजी (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) उपकरण घालण्यास सांगितलं. यासह, शारीरिक क्रियाकलाप आणि झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी मनगटावर उपकरणं घातली गेली. रक्तातील ग्लुकोजची (blood glucose) पातळी देखील सतत तपासली गेली. हा प्रयोग 2 आठवडे करण्यात आला. त्यांच्या लाळेचे डीएनए नमुनेदेखील घेतले गेले. जेणेकरून चयापचयावर कॅफिनचा अनुवांशिक परिणाम तपासता येईल. यानंतर त्यांना हवं असल्यास सलग दोन दिवस कॉफी पिण्याचे किंवा न पिण्यास सांगण्यात आलं. हे वाचा - Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा काय आला निष्कर्ष? अभ्यासातून संकलन केलेल्या डेटाच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की, - कॉफी प्यायल्यानं प्रिमॅच्युअर वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन (premature ventricular contraction) 54 टक्क्यांनी वाढले. हृदयाच्या खालच्या कप्प्यात हा एक प्रकारचा असामान्य प्रमाणात हृदयाचे ठोके आहेत. तर, जास्त कॉफी प्यायल्यानंतर वरच्या चेंबरमध्ये हृदयाचे ठोके असामान्य होते. - वारंवार कॉफी प्यायल्याने शारीरिक हालचाली जास्त राहिल्या, पण झोप कमी झाली. - जे लोक कॉफी पीत होते, ते कॉफी न पिणार्‍यांपेक्षा दररोज हजार पावले जास्त चालले. - ज्या दिवशी सहभागींनी कॉफी प्यायली, ते रात्री सरासरी 36 मिनिटे कमी झोपले. - जे लोक एक कप कॉफी प्यायले त्यांच्या हृदयाच्या खालच्या कप्प्यात हृदयाचे ठोके असामान्य असण्याची शक्यता दुप्पट आहे. कॉफीच्या प्रत्येक अतिरिक्त कपासाठी, सुमारे 600 पावले अधिक चालण्याची आणि रात्री 18 मिनिटे कमी झोपण्याची स्थिती होती. हे वाचा - …आणि प्रिया बापटने नवऱ्यालाही नाचवलं; जोडप्याच्या Videoला तुफान पसंती - कॉफी प्यायल्यानं किंवा न प्यायल्यानं ग्लुकोजच्या पातळीत फरक दिसला नाही. - कॉफी पिण्यापेक्षा जास्त शारीरिक श्रम केल्यामुळं टाईप 2 मधुमेह आणि अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्यामुळं आयुष्य वाढण्याची शक्यता निर्माण होते. - या एका बाजूला हे फायदे मिळत असतानाच झोपेच्या कमतरतेमुळं, मानसिक, चिंताग्रस्तता, हृदय आणि आतड्यांसंबंधी समस्या निर्माण झाल्याचं आढळलं. - ज्या सहभागींमध्ये अनुवांशिक कारणांमुळं कॅफिनचं चयापचय जलद झालं, त्यांच्या हृदयाचे ठोके असामान्यरीत्या जास्त होते. ज्यांच्यामध्ये चयापचयाचा वेग कमी होता, त्यांची झोप अधिक कमी झाली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coffee, Health Tips

    पुढील बातम्या