जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या 'लो बजेट' गोष्टी येतील कामी

Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या 'लो बजेट' गोष्टी येतील कामी

Weight loss tips in budget : वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या 'लो बजेट' गोष्टी येतील कामी

वजन (weight) नियंत्रणात राखणं खूप गरजेचं आहे. तुमचे वजन कमी (weight Loss) करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. बाजारात अशा अनेक स्वस्त गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याद्वारेही वजन कमी करता येऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : आजकालच्या धावपळीच्या काळात वजन (weight) नियंत्रणात राखणं खूप गरजेचं आहे. तुमचे वजन कमी (weight Loss) करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. बाजारात अशा अनेक स्वस्त गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याद्वारेही वजन कमी करता येऊ शकते. आज आपण अशाच खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेऊयात, ज्या गोष्टी तुम्हाला स्वस्तात तर मिळतीलच शिवाय वजन कमी करण्यासही मदत करू (Weight loss tips in budget) शकतात. ओट्स झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार वजन कमी करण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. एक स्वादिष्ट आणि निरोगी नाश्ता पर्याय म्हणजे ओट्स. यावरील खर्च तुमच्या बजेटमध्ये बसेल. ओटचे जाडे भरडे पीठ हे विरघळणाऱ्या फायबरचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे तुमची भूक दीर्घकाळ नियंत्रणात राहते. ओट्स खाताना साखर घालणे टाळा. त्याऐवजी मध किंवा दालचिनी किंवा जायफळ वापरा. त्यावर तुम्ही ड्रायफ्रुट किंवा फळे देखील घालून खाऊ शकता. ग्रीन टी जर तुम्हाला कॉफी पिण्याची सवय असेल, तर आता ग्रीन टीकडे वळण्याची वेळ आली आहे. तुम्ही घरी कॉफी बनवा किंवा कॅफेमधून विकत घ्या, ग्रीन टीपेक्षा एक कप कॉफीची किंमत जास्तच आहे. तसेच, ग्रीन टी कॉफीपेक्षा आरोग्यदायी आहे आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. हे वाचा -  हिवाळ्यात ही पालेभाजी खाण्याचे आहेत भरपूर फायदे; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, अनेक आजार राहतील दूर ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ग्रीन टीमध्ये असलेले कॅटेचिन पोटावरील चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पालक वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट केलेली आणखी एक बजेट-फ्रेंडली भाजी म्हणजे पालक. ही हिरवी पालेभाजी स्वस्तात मिळते पण पौष्टिकतेने परिपूर्ण असते. पालकामध्ये कॅलरीज आणि कर्बोदके कमी असतात. पालक पोषक आणि फायबरने परिपूर्ण आहे. पालक कॅलरी न वाढवता तुमची भूक नियंत्रित करते. त्यात कॅल्शियम देखील असते जे चरबी जाळण्यास मदत करते. हे वाचा -  तुम्ही आजारी पडण्यामागे प्रिझर्वेटिव्ह फूड्स तर कारण नाही ना? वाचा त्याचे दुष्परिणाम गाजर, बीन्स, शेंगा आणि कडधान्ये गाजर, बीन्स, शेंगा आणि कडधान्ये हे आरोग्यदायी पदार्थ आहेत जे तुम्ही रोज खाऊ शकता. या गोष्टी फायबर आणि प्रथिनांनी समृध्द असतात. कच्चे गाजर किंवा फक्त एक वाटी शिजवलेले सोयाबीन किंवा कडधान्ये यामुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. त्यामध्ये खूप कमी चरबी असते आणि ते कोलेस्ट्रॉल मुक्त असतात. याव्यतिरिक्त, यामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फोलेटने प्रमाण भरपूर असते. या खाद्यपदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो, त्यामुळे त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाहीत. (सूचना- ही माहिती वैद्यकीय क्षेत्रातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात