चेहेरा धुतल्यानंतर टॉवेलने पुसता? थांबा नाहीतर चेहऱ्याची लागेल वाट
काळवंडलेला आणि पिंपल्स आलेला चेहरा कोणालाही आवडत नाही. त्यामुळे आपला चेहरा नेहमी तजेलदार दिसावा तसेच त्यावर कोणतेही डाग पडू नये यासाठी बरेचजण खूप प्रयन्त करत असतात. तसेच अनेकदा चेहरा सुंदर ठेवण्यासाठी महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स देखील वापरले जातात. परंतु केवळ चांगले प्रोडक्ट्स वापरून नाही तर आपल्या चेहऱ्याची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्यापैकी अनेकजण चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने पुसतात. परंतु यामुळे त्वचेच्या समस्या अधिक वाढू शकतात. अनेकदा चेहरा पुसण्यासाठी वापरण्यात येणारा टॉवेल हा खराब असतो. त्यामुळे चेहेऱ्यावर इंफेक्शन होण्याची शक्यता असते. बॅक्टेरिया : चेहरा पुसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टॉवेलमध्ये एस्चेरिचिया कोलाई सारखे हानिकारक जीवाणू असू शकतात. जर चेहरा पुसताना हे जीवाणू जर तुमच्या त्वचेत गेले तर चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग येऊ शकतात.
पिंपल्स येतात : टॉवेलने ओला चेहरा पुसल्याने पिंपल्स येऊ शकतात. तसेच चेहेरा पुसताना टॉवेल त्वचेवर घासला जातो त्यामुळे पिंपल्सची समस्या वाढू शकते. स्किन केअर फॉलो करा : चेहरा पुसण्यासाठी मऊ टॉवेलचा वापर करू शकता. तसेच चेहेरा पुसताना त्वचेवर टॉवेल घासण्याऐवजी टॅप करा. बॅक्टेरियाचा प्रसार कमी करण्यासाठी स्वच्छ टॉवेल वापरा आणि तो केवळ तुमच्याच चेहऱ्यासाठी वापरा. Diabetes Control Tips : जेवल्यानंतर शुगर लेव्हल वाढते? मग वापरा या टिप्स होईल नॉर्मल फेशियल टिश्यू वापरा : तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी किंवा पुसण्यासाठी टिश्यू वापरू शकता. परंतु त्याने देखील चेहरा जास्त न घासता हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा. मायक्रोफायबर टॉवेल वापरा : जर तुम्हाला टॉवेलने चेहरा पुसणे सोयीस्कर वाटत असेल तर तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता. मायक्रोफायबर टॉवेल्स त्यांच्या मऊपणासाठी आणि घर्षण न करता आर्द्रता शोषण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. मायक्रोफायबर टॉवेल हे नेहमीच्या टॉवेलपेक्षा स्वच्छ असतात आणि धुवून पुन्हा वापरता येऊ शकतात.