JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Deodorant चा वापर करत आहात ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

Deodorant चा वापर करत आहात ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

उन्हाळ्यामध्ये घामाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे (Body Odour) महिला किंवा पुरुष डिओड्रन्ट (Deodorant) वापरतात. परंतु, अँटीपर्सपिरन्ट डिओड्रन्टमध्ये ऍल्युमिनियम (Aluminum)असतं जे शरीराला घातक आहे.

जाहिरात

Deodorant

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 14 जानेवारी: शरीरातून ( body ) येणारा घामाचा दुर्गंध कोणाला आवडत नाही. एखादी व्यक्ती जर दिवसभर शारीरिक मेहनतीचं काम करत असेल, तर त्याच्या शरीरातून घामाचा दुर्गंध येणं स्वाभाविक आहे. शरीरातून घामाचा दुर्गंध येणाऱ्या व्यक्तीच्या जवळ थांबणं कुणालाच आवडत नाही. अशावेळी अनेकजण दिवसभर फ्रेश आणि कॉन्फिडन्ट ( fresh and confident ) फिल मिळावा, यासाठी डिओड्रंट (Deodorant) चा वापर करतात. पण याचा अधिक वापर ब्रेस्ट कॅन्सरच्या (Breast Cancer) जोखमीशी संबंधित आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी बऱ्याचदा तुम्ही परफ्युमचा वापर करता, जेणेकरून दिवसभर तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाला त्याचा सुगंध येईल. कारण शरीराचा दुर्गंध येणं कोणालाच आवडत नाही. हे टाळण्यासाठी अनेकजण विविध सुगंधी परफ्युम, डिओड्रंट (Deodorant product) वापरतात. परंतु या सुगंधी उत्पादनांपैकी सर्वांत जास्त वापरलं जातं ते डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंट. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, तुम्ही वापरत असलेल्या डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंटमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात? काही अभ्यासातून असे समोर आले आहे की, डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंटचा जास्त वापर केल्याने महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.

गेल्या काही वर्षांत आलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंटमुळे महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रेस्ट हा अंडरआर्मचा सर्वात जवळचा भाग आहे, ज्यामुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की, डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंटच्या वापरामुळे खरंच ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो का? चला तर मग आज ते जाणून घेऊयात. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची क्षमता वेगवेगळी असते. एखाद्या व्यक्तीच्या शरीराला सूट करणारी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा सूटच होईल, असं अजिबात नसते. काही व्यक्तींच्या शरीरावर डिओड्रंट किंवा अँटीपर्स्पिरंटच्या वापराचा कोणताही विपरित परिणाम होणार नाही. काहींना मात्र याचा वापर त्रासदायक ठरू शकतो. अशावेळी बेकिंग सोडा डिओड्रंटसारखे नैसर्गिक डिओड्रंट वापरता येऊ शकतात. ठोस पुरावे नाहीत अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते, डिओड्रंटचा ब्रेस्ट कॅन्सरच्या जोखमीशी संबंध जोडण्याचे फारसे ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या 2002 च्या अहवालानुसार, ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या 813 महिलांची तुलना हा कॅन्सर नसलेल्या 993 महिलांशी करण्यात आली आहे. यामध्ये अँटीपर्स्पिरंट्स, डिओड्रंट किंवा अंडरआर्म शेविंग आणि ब्रेस्ट कॅन्सर यांच्यात कोणताही संबंध आढळला नाही, असं म्हटलं आहे. तर 2003 आणि 2009 च्या संशोधनात असं म्हटलं आहे की, यात परस्पर संबंध शक्य आहेत. मात्र, यासाठी कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. शरीरात कॅल्शियम कमी पडलं की असं होतं; अगोदरच दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा बाजारात आता विविध प्रकारचे डिओड्रंट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही डिओड्रंटमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते. त्याचा त्वचेवर अधिक मारा केल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. अशावेळी योग्य डिओड्रंटची निवड करणंही महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या