नवी दिल्ली, 14 जानेवारी : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लठ्ठपणा अनेकांची डोकेदुखी ठरली आहे. भरपूर व्यायाम करूनही काहींना वजन नियंत्रणात ठेवणं शक्य होत नाही. वजन कमी (weight loss Tips) करण्यासाठी आहारात कोरफडीचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेली पोषक तत्वे वजन कमी करण्यास मदत करतात आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते. कोरफड पचन नीट करण्यास मदत करते. कमकुवत चयापचय हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा चयापचय योग्य राहते, तेव्हा वजन कमी होऊ लागते. कोरफड चयापचय सुधारते. यामुळे शरीरात साठलेली चरबी जळते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारे आपण कोरफडीचे (Aloe Vera for weight loss) सेवन करू शकतो.
जेवण करण्यापूर्वी कोरफडीचा रस
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, वजन कमी करण्यासाठी, प्रत्येक जेवणाच्या 15 मिनिटे आधी एक चमचा कोरफडीचा रस प्या. दोन आठवडे असे केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.
भाज्यांच्या रसासह कोरफड
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसामध्ये विविध भाज्यांचा रस देखील मिसळू शकता. यामुळे तुमचे वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते. वजन कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे.
गरम पाण्यासोबत
एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा कोरफडीचा रस मिसळा आणि दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. यामुळे कोरफडीची चवही बदलेल.
हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
मधासोबत
नैसर्गिक चव वाढवण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या रसामध्ये मधाचे काही थेंब देखील घालू शकता. कोरफड तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकते.
हे वाचा - Men’s Health 40 : तुम्हीही चाळिशी पार केलीय? मग आहारात या 5 गोष्टी असायलाच हव्यात
लिंबू आणि कोरफड
कोरफडीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ताज्या लिंबाच्या रसाचे काही थेंब देखील घालू शकता. यामुळे तुमचे वजनही वेगाने कमी होईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Weight, Weight loss tips