Home /News /lifestyle /

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी पडलं की असं होतं; अगोदरच दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी पडलं की असं होतं; अगोदरच दिसणारी ही लक्षणं वेळीच ओळखा

leg pain of senior woman at home, healthcare problem of senior concept

leg pain of senior woman at home, healthcare problem of senior concept

deficient in calcium : कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. यामुळं हाडांमधील खनिजांची घनता कमी होते. त्यामुळं हाडं कमकुवत होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे (Calcium Deficiency) तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. यामुळं लहान मुलांमध्ये मुडदूस (rickets) आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, शरीरात कॅल्शियमची कमतरता भासू नये, यासाठी तुम्ही आहाराची काळजी घेणं आणि काही लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सतत दातांसंबंधी समस्या येत असतील, थकवा जाणवत असेल, त्वचा कोरडी होत असेल आणि स्नायूंमध्ये पेटके असतील तर ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं ओळखा झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा या स्थितीला हायपोकॅल्सेमिया (Hypocalcemia) म्हणतात. हायपोकॅल्सेमिया म्हणजे रक्तात कॅल्शियमचं प्रमाण खूपच कमी असणं. या स्थितीत तुम्हाला ही लक्षणं दिसतील- कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हात आणि पाय सुन्न होऊ शकतात. यामुळे पाय आणि हातांमध्ये मुंग्याही जाणवू शकतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं स्नायूंमध्ये पेटके आणि स्नायू कमकुवत होऊ शकतात. -हायपोकॅल्सेमियाचा मेंदूच्या कार्यावरही परिणाम होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे प्रौढांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. यामुळं हाडांमधील खनिजांची घनता कमी होते. त्यामुळं हाडं कमकुवत होऊन फ्रॅक्चर होण्याचा धोका असतो. त्वचा कोरडी पडणं हेदेखील शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेचं लक्षण आहे. अशा स्थितीत त्वचेला ओलावा आणि निरोगी पीएच राखता येत नाही आणि त्वचेत कोरडेपणा येऊ लागतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं दात आणि हिरड्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कमी कॅल्शियम पातळीमुळं मुलांना मुडदूस रोग होऊ शकतो. यामुळं हाडं ठिसूळ होऊन सहजपणे मोडू शकतात. मज्जातंतू, स्नायू आणि हृदयाच्या कार्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. हे वाचा - नव्या सुरक्षा धोरणात पाकिस्तानचं लोटांगण, पुढील 100 वर्ष भारताशी पंगा न घेण्याचा निर्णय महिलांमध्ये हार्मोनल बदल आणि अनेक अनुवांशिक घटकांमुळं शरीरातील कॅल्शियमच्या पातळीवरही परिणाम होतो. सतत थकवा जाणवणं आणि स्नायूंमध्ये पेटके येणं ही कॅल्शियमच्या कमतरतेची चिन्हं आहेत आणि आपल्या शरीराला कॅल्शियमची गरज असल्याचं सूचित करते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं दात आणि हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. हे सामान्यतः मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये दिसून येते. तज्ज्ञांच्या मते नसा, स्नायू आणि हृदयाच्या योग्य कार्यासाठीदेखील कॅल्शियम आवश्यक आहे. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र या गोष्टींचा आहारात समावेश करा कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात न घेतल्यानं किंवा अ‌ॅलर्जीमुळं किंवा कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन सहन होत नसल्यास शरीरात या आवश्यक पोषक घटकांची कमतरता होऊ शकते. कॅल्शियम हाडांमधील खनिजांच्या घनतेसाठी (बोन मिनरल डेनसिटी - Bone Mineral Density) आणि आपल्या दंत आरोग्यासाठी (Dental Health) खूप महत्वाचं आहे. दूध, चीज, दही, भेंडी, हिरव्या पालेभाज्या, शेंगा आणि सार्डिन मासे हे कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत. यांचा आहारात समावेश करावा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या