केसांना मेहेंदी लावताना या चुका टाळा, अन्यथा केसांचे वाजतील बारा
महिला पांढरे केस रंगवण्यासाठी अधिकतर नैसर्गिक पर्याय म्हणून मेहंदीचा वापर करतात. केसांना मेहेंदी लावत असताना त्याचा रंग गडद व्हावा आणि आपल्या केसांना काही नुकसान होऊ नये म्हणून महिला मेहेंदी भिजवताना त्यात किचनमधील अनेक वस्तूंचा वापर करतात. परंतु केसांच्या मेहेंदीमध्ये कोणताही पदार्थ मिसळताना तो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खरोखरच फायद्याचा आहे की नाही हे समजून घेतले पाहिजे, अन्यथा आपल्या केसांचे बारा वाजलेच म्हणून समजा. मेहंदी भिजवल्यानंतर लगेच लावू नका : तुम्ही मेहंदी भिजवल्यानंतर जर केसांना लगेच लावत असाल तर असे करणे चुकीचे आहे. कारण यामुळे मेंदीचा रंग केसावर चढत नाही आणि त्यात असणारे आवश्यक आणि पोषक घटक ही केसांना मिळणार नाहीत. यासाठी मेहंदी नेहमीच दहा ते बारा तास आधी भिजवून ठेवावी. तसेच रात्री मेहंदी भिजवून तुम्ही ती सकाळी केसांना लावू शकता. अंड आणि दही : मेहेंदीमध्ये अंड आणि दही अजिबात मिक्स करू नका. अनेकजण मेहंदीत अंड किंवा दही मिक्स केल्याने केसांना पोषण मिळेल असे समजतात. परंतु असे करणे केसांसाठी चांगलं नाही. कारण अंडी आणि दही मेहंदी मध्ये असलेल्या प्रोटीन बरोबर बॉण्डिंग होते. यामुळे केसांना आवश्यक असणारे प्रोटीन मिळत नाही.
केसांना तेल लावू नका : डोक्याला मेहंदी लावणार असाल तर तुम्ही केसांना तेल लावू नका. जर तुम्हाला तेल लावायचेच असेल तर तुम्ही एक दिवस आधी थोडे तेल तुमच्या केसांच्या मुळाशी लावू शकता. तेल लावल्यामुळे केसांच्या वर एक तेलाचा थर बनतो त्यामुळे मेहंदीचा रंग त्यावर चढत नाही. साध्या पाण्यात मेहंदी भिजवू नका : केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा असे वाटत असेल तर साध्या पाण्यात ते कधीही भिजवू नका. मेहेंदी ही कॉफी अथवा चहा पत्तीच्या पाण्यात मिक्स करून भिजवल्यास केसांचा रंग चांगला गडद होतो. तुम्ही हे पाणी गार करू मग त्यानंतर मेहंदीसाठी वापरू शकता. पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम लिंबाच्या रसाचा वापर करू नका : मेंदी भिजवत असताना त्यामध्ये लिंबूचे रस अजिबात वापरू नका. कारण हा घटक आपल्या केसांना ड्राय बनवतो. लिंबूच्या रसामध्ये सिट्रिक एसिड असते, ज्याच्या वापर केसांमध्ये करू नये. केसातील कोंडा कमी करण्यासाठी लिंबूचा वापर अनेक वेळा होतो परंतु यामुळे केस खूप कोरडे होतात.