जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात फंगल इंफेक्शनने त्रस्त आहात? मग या घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळा ऋतूत अनेकांना फंगल इंफेक्शनचा त्रास होतो. तेव्हा ही समस्या वाढण्यापूर्वीच तुम्ही यावर घरगुती उपाय करून समस्ये पासून आराम मिळवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पावसाळा हा बहुतेकांचा आवडता ऋतू असला तरी या ऋतूमध्ये आरोग्याची काळजी न घेतल्यास अनेक आजारांचा धोका उद्भवतो. अनेकदा रस्त्यात साठलेले पाणी, दमट हवामान, पावसात भिजणे इत्यादींमुळे पावसाळा ऋतूत अनेकांना फंगल इंफेक्शनचा त्रास होतो. फंगल इंफेक्शन झाल्यावर त्वचेवर लाल चट्टे तसेच फोड्या येऊन खाज येऊ लागते. यावर वेळीच योग्य उपचार न केल्याने हे इंफेक्शन हळहळू त्वचेच्या एका भागापासून संपूर्ण शरीरभर पसरते, तसेच फंगल इंफेक्शनने संक्रमित व्यक्तीने काळजी न घेतल्यास त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींना देखील फंगल इंफेक्शन होऊ शकते. अशावेळी  फंगल इंफेक्शनची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करू शकता. अशाच काही प्रभावी घरगुती उपायांबद्दल जाणून घेऊयात. कडुलिंब : पावसाळ्यात त्वचेवरील फंगल इंजेक्शन टाळण्यास तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करू शकता. त्यामुळे फंगल इंजेक्शनच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून उकळवून त्या पाण्याने अंघोळ केल्यास फंगल इंजेक्शनमध्ये येणाऱ्या खाजेपासून आराम मिळू शकतो. टी ट्री ऑइल : पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इंजेक्शनची समस्या कमी करण्यासाठी संसर्ग झालेल्या भागावर टी ट्री ऑइल वापरू शकता. याच्या मदतीने तुमच्या त्वचेवरील इंफेक्शन लवकर बरे होण्यास मदत होईल.

News18लोकमत
News18लोकमत

हळद : हळद ही खूप गुणकारी आहे. पावसाळ्यात होणाऱ्या फंगल इन्फेक्शनच्या समस्यांवर हळदीची पेस्ट लावल्याने तुम्हाला आराम मिळू शकेल. खोबरेल तेल : फंगल इंजेक्शनची समस्या असल्यास त्यावर खोबरेल तेल वापरल्याने फंगल इन्फेक्शन कमी होऊ शकते. तसेच यामुळे सूज आणि लालसरपणापासून आराम मिळतो. Cooler Bad Smell : कूलरमधून येतो घाणेरडा वास, या घरगुती उपायांनी काही मिनिटांत करू शकता दूर कोरफड : संसर्ग झालेल्या भागावर एलोवेरा जेल लावल्याने त्वचेला काहीसा थंडावा मिळेल आणि लालसरपणा कमी होण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकेल. (घरगुती उपाय हे फंगल इंफेक्शनवर काही अंशी प्रभावी ठरतात, परंतु यासोबत तुम्ही फंगल इंफेक्शन वाढू नये यासाठी डॉक्टरांचा देखील सल्ला घेणे आवश्यक आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात