वॉशिंग्टन, 29 डिसेंबर : माणसांची एक ठरलेली विशिष्ट शरीररचना असते. प्रत्येकाच्या शरीरातील अवयवांची संख्याही समानच असते. पण एक महिला मात्र याला अपवाद ठरली आहे. सामान्यपणे महिलांच्या शरीरात एक गर्भाशय (Uterus) असतं. पण अमेरिकेतील या महिलेच्या शरीरात एक नव्हे तर दोन गर्भाशयं होती (Double Uteruses Woman). त्यापेक्षाही धक्कादायक म्हणजे एकाच वेळी ती दोन्ही गर्भाशयातून प्रेग्नंट राहिली (Woman pregnant with Double Uteruses). नेब्रास्कामध्ये (Nebraska) राहणारी मेगन फिफ्स. जिच्या पोटात एक नाही तर दोन-दोन गर्भाशयं आहेत. याला वैद्यकीय शास्त्रात यूट्रिन डिडेल्फिस (Uterine Didelphys) असं म्हटलं जातं. याबाबत डॉक्टरांना माहिती असते पण या दोन्ही गर्भाशयात एकाच वेळी गर्भ राहिल्याचं पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार मेगनला आधी दोन मुलं आहेत. ही दोन्ही मुलं तिच्या उजव्या बाजूच्या गर्भाशयातून झाली होती. त्यामुळे आपलं डावं गर्भाशय कार्य करत नाही, असं तिला वाटलं. पण तिसऱ्या प्रेग्नन्सीत तिला समस्या जाणवली. तिने याबाबत डॉक्टरांना विचारलं. तेव्हा तपासणीत तिच्या दोन्ही गर्भाशयात गर्भाची वाढ होत असल्याचं तिला समजलं. हे वाचा - तुमच्या मुलांचं असं हसणं हसण्यावर घेऊ नका; ही बाललीला नव्हे तर भयंकर आजार गुड मॉर्निंग अमेरिका नावाच्या एका शोमध्ये तिने आपल्या प्रेग्नन्सीचा अनुभव शेअर केला. प्रेग्न्सीच्या 22 व्या आठवड्यातच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. मेगनची डिलीव्हरी झाली. प्रेग्नन्सीच्या पाचव्या महिन्यात तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यावेळी त्यांचं वजन 453 ग्रॅमपेक्षाही कमी होतं. एका मुलीच्या जन्मानंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाला. दुर्दैवाने 12 दिवसांतच तिच्य पहिल्या मुलीचा मृत्यू झाला. दुसरी मुलगी रिसला 45 दिवस व्हेंटिलेटवर ठेवावं लागलं आणि ती वाचली. हे वाचा - अजबच! महिलेने तीन महिन्यात दोन मुलांना दिला जन्म; कसा झाला हा चमत्कार? 2000 महिलांपैकी एकामध्ये अशी दोन गर्भाशय असू शकतात आणि दोन्ही गर्भाशयात प्रेग्नन्सीची शक्यता 5 कोटी महिलांपैकी एक असते.