मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमच्या मुलांचं असं हसणं हसण्यावर घेऊ नका; ही बाललीला नव्हे तर भयंकर आजार

तुमच्या मुलांचं असं हसणं हसण्यावर घेऊ नका; ही बाललीला नव्हे तर भयंकर आजार

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

लहान मुलांना अचानक येणारं हसू हे दुर्मिळ आजाराचं लक्षण असू शकतं.

हैदराबाद, 28 डिसेंबर : लहान मूल (Child) म्हटलं की काही ना काही बाललीला दाखवत असतात. त्यामुळे त्यांनी काही केलं तरी आपल्याला त्याचं कौतुक वाटतं, हसू येतं. बऱ्याच वेळा लहान मुलं खूप हसतात (Laughing disease). पण प्रत्येक वेळी मुलांचं हसणं म्हणजे त्यांची बाललीलाच असेल असं नाही तर ते एका दुर्मिळ गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं (Rare disease).

ग्रेस नावाची एक 3 वर्षांची चिमुकली अशाच दुर्मिळ आजाराने ग्रस्त होती. तिला काहीही कारण नसताना अचानक हसू यायचं. तिचं हसू पाहून तिच्या पालकांनाही तिची चिंता वाटू लागली. त्यामुळे तिला बऱ्याच रुग्णालयात नेण्यात आलं. पण काहीच परिणाम झाला नाही. अखेर तिला  हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथ तपासणीत ती गेलॅस्टिक सीझर्सने ग्रस्त  (Gelastic Seizures) असल्याचं निदान झालं.

हा आजार सामान्यपणे लहान मुलांमध्ये दिसून येतो. नवजात बालकांनाही असतो. अभ्यासानुसार हा दुर्मिळ आजार आहे. दर दोन लाख मुलांमध्ये फक्त एका मुलाला हा आजार असतो.  काही कारण नसताना हसणं हेच या आजाराचं लक्षण आहे.

हे वाचा - आश्चर्यच! याला कोकरू म्हणावं की बाळ? बकरीच्या पोटी जन्माला आलं माणसासारखं पिल्लू

डॉक्टरांच्या माहितीनुसार सहा महिन्यांपूर्वी मुलीला महिन्यातून फक्त एकदा-दोनदा झटका यायचा आणि हा फक्त 10 सेकंद असायच. पण आता दिला दिवसातून 5-6  वेळा झटके येऊ लागले आणि ते एका मिनिटापर्यंत असायचे. तिचा एक डोळा तिरळा होऊ लागला होता.

एलबी नगरच्या कामिनेनी रुग्णालयात (Kamineni Hospital LB Nagar) या मुलीची तपासणी करण्यात आली. तिचं हाई अँड 3T MRI करण्यात आलं. त्यात तिच्या रक्तवाहिन्या, नसांमध्ये समस्या दिसून आली. हाइपोथॅलेमस  या मेंदूतील एका भागात एक जखम दिसली.  त्यानंतर तिच्यावर सर्जरी करण्यात आली.

हे वाचा - कोरोना काळात लहान मुलांना अनेक आजारांपासून कसे ठेवाल दूर? जाणून घ्या, काही टिप्स

झी न्यूजच्या रिपोर्टनुसार कामिनेनी हॉस्पिटल्सच्या मिनिमल एक्सेस ब्रेन अँट स्पाइन सर्जन आणि कन्सल्टेन्ट न्यूरोसर्जन डॉ. रमेश यांनी सांगितलं, मुलीच्या पालकांना तिच्या आजाराबाबत, उपचाराबाबत आणि जोखीमीबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्या परवानगीनंतर मुलीची सर्जरी करण्यात आली. आता तिला येणाऱ्या झटक्यांचं प्रमाण कमी झालं आहे.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Parents and child, Rare disease