JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / World's Shortest IQ Test : फक्त 3 प्रश्न, 80% लोक फेल; तुम्हाला येतंय का उत्तर पाहा

World's Shortest IQ Test : फक्त 3 प्रश्न, 80% लोक फेल; तुम्हाला येतंय का उत्तर पाहा

World’s Shortest IQ Test : 3 प्रश्नांची उत्तरं देण्यात भलेभले फेल पाहा तुम्हाला तरी जमतंय का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 जानेवारी : आपल्याला सर्वांनी हुशार, बुद्धिमान, इंटेलिजेंट म्हणावं असं कुणाला वाटत नाही. किती तरी इन्टेलिजेन्स टेस्ट आयोजित केल्या जात. आयक्यू टेस्ट पास केल्यानंतर त्या व्यक्तीला सर्वात बुद्धिवान व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. सोशल मीडियावर नुकतंच जगातील सर्वात छोटं आयक्यू टेस्ट जारी (World’s Shortest IQ Test) करण्यात आलं आहे. या टेस्टला Cognitive Reflection Test म्हटलं जातं आहे. ज्यात फक्त तीन प्रश्न आहेत. 2005 साली MIT प्रोफेसर शेन फ्रेडरिक यांनी आपल्या रिसर्च पेपरमध्ये हे प्रश्न छापले होते. जे पुन्हा ऑनलाईन शेअर केले जात आहेत. ही टेस्ट देण्यासाठी 3 हजार लोकांनी सहभाग नोंदवला. येल आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. 83 टक्के लोकांनी या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं. फक्त 17 टक्के लोकांनी हे तिन्ही प्रश्न सोडवले आहेत. फक्त या तीन प्रश्नांची योग्य उत्तरं देण्यात 80 टक्के लोक फेल झाले आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रश्नांची उत्तरं दिली तर बुद्धिवान व्यक्तींच्या यादीत तुमची गणना होईल. हे वाचा -  या PHOTO दडलंय एका मुलीचं नाव; तुम्ही सांगू शकाल का? आता हे प्रश्न नेमके कोणते ते पाहुयात. 1) एक बॅट आणि एका बॉलची किंमत  1.10 डॉलर आहे. बॅटची किंमत बॉलच्या किमतीपेक्षा 1 डॉलर जास्त आहे. मग बॉलची किंमत किती ते सांगा. 2) पाच मशीनला पाच विजेट बनवण्यासाठी 5 मिनिटं लागतात. 100 मशीनला 100 विजेट बनवण्यासाठी किती वेळ लागेल? 3) एका तलावात लिली पसरली आहे. दरदिवशी दुप्पट वेगाने ती परसते आहे. जर लिलीला संपूर्ण तलावात पसरण्यास 48 दिवस लागत असतील तर निम्म्या तलावात लिली किती दिवसात पसरेल. हे वाचा -  OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल या तिन्ही प्रश्नांची लोकांनी सामान्यपणे दिलेली उत्तरं अनुक्रमे 10 सेंट्स, 100 मिनट्स, 24 दिवस आहे. पण ही उत्तरं चुकीची आहेत. तुम्ही याचं उत्तर देऊन शकता का? तर इथंच थांबा आणि आधी आमच्या कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर द्या त्यानंतर पुढे तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते तपासा. काय आहे तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरं? प्रोफेसर फेड्रिक यांच्या मते, या तिन्ही प्रश्नांची योग्य उत्तरं अनुक्रमे, 5 सेंट्स, 2. 5 मिनट्स आणि 3. 47 मिनट्स आहे. काय तुमचं उत्तर हेच आहे का? मग तुम्ही बुद्धिमान आहात. आता ही बातमी इतरांना शेअर करून त्यांच्याही बुद्धिमतेची चाचणी तुम्ही जरूर घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या