Home /News /viral /

OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल

OMG! डोळे बंद करून तरुणाने असं काही केलं की VIDEO पाहताच तोंडात बोटं घालाल

जे अनेकांना डोळे उघडे ठेवूनही करणं कठीण वाटतं ते या तरुणाने डोळे बंद ठेवून करून दाखवलं आहे.

  इंदौर, 20 जानेवारी : तुम्ही लहाणपणी आंधळी-कोशिंबीर, मटका फोडी, हत्तीला शेपूट काढणं असे खेळ नक्की खेळला असाल. या खेळात डोळ्यावर पट्टी बांधली जाते. डोळे बंद झाल्यानंतर हा खेळ खेळताना काय अवस्था झाली होती, हे तुमच्या लक्षात असेल. हे तर फक्त खेळच आहेत. पण अशी काही कामं जी डोळ्यांनी न पाहता करणं आपल्याला शक्यच नाही, असं काम तुम्हाला कुणी करून दाखवलं तर साहजिक आश्चर्य वाटेल. सध्या असाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Social media viral video). एका तरुणाने डोळ्याला पट्टी बांधून असं काम करून दाखवलं आहे, जे डोळे उघडे असतानाही अनेकांना जमत नाही किंवा कठीण वाटतं (Man cuts vegetables by blindfolding). डोळ्यांवर पट्टी बांधून त्याने नूडल्स बनवले आहेत (man make noodles by blindfolding). आता नूडल्स म्हटलं की त्यामध्ये भाज्या आणि बरेच सॉस आले (man chopping skill video). हे वाचा - महिलेने तर कमालच केली! चक्क नूडल्सपासून बनवला स्कार्फ; कसं ते तुम्हीच पाहा VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता हा तरुण डोळ्यांवर पट्टी बांधून चक्क कोबी कापताना दिसतो आहे  (Man cutting cabbage by blindfolding)  . कोबी कापताना त्याचा वेगही थक्क करणारा आहे. त्याची छोटीशी चूकही त्याला चांगलीच महागात पडली असती. जरा जरी चाकू इथला तिथे हलला असता तर त्याचा हात कापण्याचीही शक्यता होती. त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना आपल्यालाही धडकी भरते.
  कोबी कापल्यानंतर तो कढईत टाकून फ्राय करतो. त्यानंतर त्या कढईत  नूडल्स आणि काही सॉस टाकतो. नूडल्स तयार होताच एका प्लेटमध्ये काढतो आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सजवतो. हे वाचा - बोलणारे पोपट खूप पाहिले आता या पोपटाचा VIDEO पाहा; कान,डोळ्यावर विश्वास बसणार ना नागपूर बज नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशच्या इंदौरमधील साई कृपा चायनीज सेंटरवरील असल्याचा सांगितला जातो आहे.  हा एक स्ट्रीट फूड विक्रेता आहे. इंदौरी जॅक स्पॅरो (Indori Jack Sparrow)  नावाने तो प्रसिद्ध आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Indore, Madhya pradesh, Shocking viral video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या