JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अरे बापरे! हे पोट आहे की....! तीव्र वेदनेने त्रस्त रुग्णाचा X-ray पाहून डॉक्टरही हादरले

अरे बापरे! हे पोट आहे की....! तीव्र वेदनेने त्रस्त रुग्णाचा X-ray पाहून डॉक्टरही हादरले

रुग्णाच्या पोटात डॉक्टरांना असं काही सापडलं की त्यांनाही धक्का बसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विलनिअस, 02 ऑक्टोबर :  आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या पोटात (Stomach pain) कधी ना कधी दुखतं. याची बरीच कारणं असतात. अयोग्य आहार, पोटाची एखादी समस्या (Stomach problem) किंवा एखाद्या आजाराचं हे लक्षण असतं. पण काही वेळा हे विचित्र सवयींचे दुष्परिणाम असू शकता. अशाच एका विचित्र सवयीमुळे एका व्यक्तीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागली. त्याची तपासणी केली असत त्याच्या पोटात जे दिसलं ते पाहून डॉक्टरही हादरले. लिथुआनियातील (Lithuania) या व्यक्तीच्या पोटात (Abdominal Pain) अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याला तात्काळ क्लाइपेडा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये (Klaipeda University Hospital) दाखल करण्यात आलं. तिथं त्याच्या पोटाचा एक्स-रे (X-Ray) काढण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनाही धक्का बसला. हे वाचा -  हद्दच झाली! ऑपरेशनवेळी डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे त्या व्यक्तीच्या पोटात चक्क लोखंड (Iron) होतं. डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन केलं. त्यावेळी तब्बल एक किलो लोखंड  (1 Kilo iron)  त्या व्यक्तीच्या पोटातून काढलं (Iron metal objects in stomach). यामध्ये खिळे, स्क्रू, नटबोल्ट आणि चाकू यांचा समावेश होता. तब्बल तीन तासांपेक्षा जास्त वेळ हे ऑपरेशन सुरू होतं. द सनच्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीला दारूचं व्यसन होतं. पण गेल्या महिनाभरापासून तो दारू प्यायला नाही, त्याने दारू सोडली आहे. दारू प्यायची तलब होऊ नये म्हणून तो लोखंडाचे छोटे-छोटे तुकडे खायचा. हे वाचा -  ढुसकी सोडणारा सुपरहिरो; याच्याकडे विचित्र सुपरपॉवर, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद एका सर्जनने याला आयर्न मॅन म्हटलं आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी असं प्रकरण याआधी कधीच पाहिलं नाही. लोखंडामुळे या व्यक्तीच्या पोटाला हानी  पोहोचली होती आता या व्यक्तीची प्रकृती ठिक आहे. पण तिला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या