जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हद्दच झाली! ऑपरेशनच्या भीतीने डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे

हद्दच झाली! ऑपरेशनच्या भीतीने डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे

हद्दच झाली! ऑपरेशनच्या भीतीने डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे

रुग्णालयाचं बिल पाहून महिलेला धक्काच बसला.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 02 ऑक्टोबर : लहानपणी बहुतेकांना इंजेक्शन (Injection), औषधं घेताना रडूच कोसळतं. लहान मुलंच नाही तर काही प्रौढ व्यक्तींनासुद्धा याची भीती वाटते. इंजेक्शन, औषध हे तर सामान्य झालं पण याला घाबरणारे आणि न घाबरणारेही ऑपरेशनला मात्र घाबरतात. सर्जरी म्हटलं की पायाखालची जमीनच सरकते. ऑपरेशन टेबलवर गेल्यावर घामच फुटतो आणि रडूही येतं (Crying in Hospital). सर्जरीसाठी गेलेल्या अशाच एका महिलेच्या डोळ्यातून भीतीने पाणी आलं आणि मग काय रुग्णालयाने ऑपरेशन, औषधांसह तिच्या रडण्याचंही बिल वसूल केलं (Woman Charged for crying in surgery). काय आश्चर्य वाटलं ना? मिज नावाच्या एका महिलेने आपला रुग्णालयातील हा विचित्र अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटरवर तिने रुग्णालयाच्या बिलाचा फोटो पोस्ट केला आहे. तिने रुग्णालायने आपल्याकडून रडण्याचेही पैसे वसूल केले, असा दावा केला आहे.

जाहिरात

महिलेने सांगितल्यानुसार ती आपल्या एका तिळाची सर्जरी करण्यासाठी गेली होती. या सर्जरीचा एकूण खर्च 223 डॉलर्स म्हणजे 16,526 हजार रुपये झालं. हे वाचा -  ना डायलिसिसची गरज, ना ट्रान्सप्लांटची; किडनी रुग्णांसाठी आता Artificial Kidney पण या बिलातील एका गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेते. ती म्हणजे ब्रीफ इमोशन. ज्यासाठी 11 ़डॉलर्स म्हणजे जवळपास 800 रुपये आकारण्यात आले आहेत (Woman Charged 800 rupees for crying). आपण सर्जरीवेळी रडल्याने हे पैसे आकारले असा दावा या महिलेने केला आहे. रिपोर्टनुसार ही महिला अमेरिकेतील आहे. हे बिल अमेरिकेतील कोणत्या तरी रुग्णालयाचं आहे. पण हे बिल कोणत्या रुग्णालायचं आहे, याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे हे बिल खरं आहे, असा दावा न्यूज 18 करत नाही. हे वाचा -  Shocking! डोक्यात घुसून खाल्ला संपूर्ण मेंदू; अमिबाने घेतला चिमुकल्याचा जीव रुग्णालयाच्या या विचित्र बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सनी रुग्णालयाविरोधात प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जणांनी यावर महिलेला मजेशीर प्रश्न विचारले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात