जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ढुसकी सोडणारा 'सुपरहिरो'; याच्याकडे विचित्र सुपरपॉवर, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

ढुसकी सोडणारा 'सुपरहिरो'; याच्याकडे विचित्र सुपरपॉवर, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

ढुसकी सोडणारा 'सुपरहिरो'; याच्याकडे विचित्र सुपरपॉवर, वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद

सुपरहिरोंसारखी सुपरपॉवर आपल्याकडे हवी असे प्रत्येकाला वाटतं. पण रिअल लाइफमधील या व्यक्तीकडे अशी पॉवर आहे, जी तुम्हाला नकोच अशी वाटेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 02 सप्टेंबर : सुपरमॅन (Superman), स्पायडरमॅन (Spiderman), बॅटमॅन (Batman) हे सुपरहिरो (Superhero) तुम्हाला माहितीच आहेत. या प्रत्येकाला एक वेगळी सुपरपॉवर (Superpower) असते. खरंतर हे सुपरहिरो काल्पनिक पात्र आहेत. म्हणजे ते फक्त आपल्याला ऑनस्क्रिन दिसतात. प्रत्यक्षात असे सुपरहिरो नाहीत. पण तरी आपल्याकडे अशी सुपरपॉवर हवी असे प्रत्येकाला वाटतं. पण प्रत्यक्षात एक सुपरहिरो असा आहे, ज्याच्याकडे अशी सुपरपॉवर आहे, जी तुम्हाला नकोच अशी वाटेल (Farting power). ब्रिटनमधील (Britain) पॉल ओल्डफिल्ड (Paul Oldfield) ज्यांना मिस्टर मिथेन (Mr Methane) म्हणून ओळखला जातं.  त्यांच्याकडे अशी सुपरपॉवर आहे, ज्यामुळे सर्वांना आपलं नाक बंद करावे लागतात. मिस्टर मिथेन यांच्याकडे फार्ट (Fart)  करण्याची म्हणजे पादण्याची शक्ती आहे (Farting Powers). आता फार्ट ही शारीरिक आणि नैसर्गिक प्रक्रिया प्रत्येक माणसात आहे. ही कुणाची पॉवर कशी काय असू शकते, असं तुम्हाला वाटेल. पण सामान्यपणे फार्ट हा पोटात गॅस झाल्यानंतर कधीतरी येतो. म्हणजे त्यावर आपलं नियंत्रण नसतं. पण पॉल  हे आपल्या मर्जीने म्हणजे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते फार्ट करू शकतात. हे वाचा -  हद्दच झाली! ऑपरेशनवेळी डोळ्यातून आलं पाणी; रुग्णालयाने रडण्याचेही वसूल केले पैसे पॉल जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांना आपल्याकडे असलेल्या या विचित्र क्षमतेबाबत समजलं. पॉल योगा करत होते. लोटस पोझिशन करत असताना त्यांना समजलं की ते आपल्या गुदद्वारातून आपल्या मर्जीने गॅस सोडू शकतात. यानंतर ते ट्रेन कंडक्टर बनले. आपल्या मित्रांना ते फार्ट करून दाखवयाचे आणि त्यांचं मनोरंजन करायचे. त्यावेळी ते एका मिनिटात 20 वेळा फार्ट करायचे. पण नंतर त्यांनी स्वतःला ट्रेन केलं आणि मनोरंजन क्षेत्रात जाण्याचं ठरवलं. ब्रिटन गॉट टॅलेंटसारख्या रिअॅलिटी शोमध्ये ते गेले. टीव्हीवर दिसू लागले. हे वाचा -  काय म्हणावं याला! चक्क Pressure cooker सोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट आता ते आपल्या या अनोख्या क्षमतेसह जगभर फिरतात. अनेक कार्यक्रम करतात, टीव्हीवर शो करतात, यातूनच ते पैसेही कमावतात. 2018 साली त्यांनी आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. गिनीज वर्ल्डचा लोकांशी संपर्क करून आपल्या या क्षमतेची त्यांनी माहिती दिली. एका मिनिटांत आपण 50 वेळा फार्ट करू शकतो, असा दावा त्यांनी केला होता. पण प्रत्यक्षात त्यांनी आपलाच रेकॉर्ड तोडत एका मिनिटांत 86 वेळा फार्ट करून विश्वविक्रम केला. त्यानंतर ते मिस्टर मिथेन म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात