JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक

पायाची किरकोळ दुखापत 11 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतली; मृत्यूचं कारण धक्कादायक

ट्रेडमिलवर धावताना 11 वर्षीय मुलाच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यूच झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 17 फेब्रुवारी : बऱ्याचदा चालताना-धावताना पडल्याने, काही काम करताना किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला किरकोळ  जखमा, दुखापती होतात. पण त्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही.  पण अशीच छोटीशी जखम एका मुलाला झाली आणि ते त्याच्या जीवावर बेतलं. या मुलाच्या शरीरात असा जीव घुसला जो डोळ्यांनी दिसत नाही. शरीरात घुसल्यानंतर या जीवाने मुलाचं अख्खं शरीर पोखरून काढलं. त्याची इतकी भयंकर अवस्था झाली की त्याचा मृत्यू झाला. जेसी ब्राऊन असं या मुलाचं नाव आहे. अमेरिकेत राहणारा 11 वर्षांचा जेसी, ट्रेडमिलवर धावत असताना त्याच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. जेसीच्या चुलत भावाने सांगितलं, जेसी पडला तेव्हा व्यायाम करत होता. दुखापत झालेल्या ठिकाणी आधी तपकिरी, नंतर जांभळा आणि लाल रंग आला. त्याला आयसीयूमध्ये नेण्यात आलं. त्याला विचित्र संसर्ग झाल्याचं आढळून आलं. त्याच्या मेंदूला सूज आली आणि त्याचा मृत्यू झाला. हे वाचा -  आश्चर्य! 32 वर्षीय महिला झोपून उठताच बनली 17 वर्षांची मुलगी; हे कसं काय झालं? युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरचे संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. अॅलन क्रॉस यांनी सांगितलं, हे जीवाणू अत्यंयत धोकादायक आहेत. याचा संसर्ग खूप वेगाने पसरतो. त्यामुळे शरीरात विष निर्माण होते. याचं संक्रमण जखमांमधून होतं. त्यामुळे जखमेची नीट साफसफाई करणे आणि नंतर त्यावर योग्य उपचार करणे. जखम कधीही दुर्लक्षित ठेवू नये.

काही वर्षांपूर्वी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (आरजीकेएमसीएच) एका 44 वर्षीय व्यक्तीचा या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. मृण्मय रॉय असे मृताचे नाव. हे वाचा -  वेगवेगळ्या असतात सर्व स्पोर्ट्स इन्ज्युरीज, प्रकारानुसार `हे` उपाय ठरतील फायदेशीर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मांस खाणाऱ्या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय भाषेत याला नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिस म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या