मुंबई, 15 फेब्रुवारी : सामान्यपणे प्राणी असो वा माणूस त्यांचं वय वाढत जातं. वाढत्या वयात तरुण दिसण्यासाठी बरेच उपाय केले जात असले तरी वय कमी करणं शक्य नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक 32 वर्षांची महिला चक्क 17 वर्षांची मुलगी बनली आहे. ती झोप ली आणि झोपेतून उठताच तिचं वय दुपटीने कमी झालं. एका रात्री असं या महिलेसोबत काय घडलं, हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. नेल्श पिले असं या महिलेचं नाव. ती झोपली तेव्हा 32 वर्षांची होती. पण उठताच ती 17 वर्षांची झाली. नेल्शचं लग्न झालं असून तिला सहा वर्षांची एक मुलगीही आहे. पण ती याबाबत सर्व विसरली. ना तिला तिची मुलगी लक्षात आहे, ना तिचा नवरा. मिररच्या रिपोर्टनुसार, महिला आपल्या पार्टनरला टॅक्सी ड्रायव्हर समजते. तर मुलीकडे ती आपलं नव्हे तर इतर लहान मुलांप्रमाणेच समजते. लहान मुलांची काळजी कशी घ्यायची हेसुद्धा तिला जमत नाही आहे. हे वाचा - ऐन तारुण्यात असं काही घडलं की कायमची उडाली झोप; 80 वर्षांचे आजोबा गेली 60 वर्षे जागेच, तरी ठणठणीत वयाच्या सतरा वर्षांपासून ते 32 वर्षांपर्यंतचं ती सर्वकाही विसरली. जो तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग होता. आपल्यासोबत असं का झालं हे जाणून घेण्यासाठी ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा तिच्या डोक्याला झालेल्या जुन्या दुखापतीमुळे आणि सर्जरीमुळे तिची अशी अवस्था झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 9 वर्षांची असताना तिचा अपघात झाला होता, तेव्हा तिच्या मेंदूला दुखापत झाली होती. तिला बऱ्याच वेळा डोकेदुखी, उलटी अशी समस्या होते. मध्ये मध्ये तिला काही क्षण आठवतात. असं करत तिला बऱ्याच गोष्टी आठवल्या आहेत. डॉक्टरांनी तिला आता कॉफी, अल्कोहोल आणि तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा - BF समजून तरुणीने वडिलांनाच…; झोपेत असं काही करून बसली की झोप कायमची उडाली; VIDEO VIRAL यात सर्वात चांगली गोष्टी म्हणजे तिचं तिच्या पार्टनरवर पुन्हा प्रेम झालं आहे. ती सर्वकाही विसरलं पण पार्टनरसोबत तिला सर्वकाही नवंनवं वाटत आहे. तिने स्वत: त्याला लग्नासाठी प्रपोज केलं आणि 20 जानेवारीपसून दोघांनी नव्याने आयुष्याला सरुवात केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.