मुंबई, 16 फेब्रुवारी : स्पोर्ट्स इंज्युरी अर्थात खेळाताना दुखापत होणं हे अत्यंत सामान्य आहे. सुमारे 21 टक्के सक्रिय प्रौढ व्यक्तींना ही समस्या जाणवते. तरुण अॅथलिट्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अंदाजे 44 टक्के तरुणांना त्यांच्या अॅथलेटिक करिअरमध्ये केव्हातरी दुखापतींचा सामना करावाच लागतो. स्पोर्ट्स इंज्युरीज या सौम्य ते गंभीर स्वरुपाच्या असू शकतात. याचे प्रामुख्याने अॅक्यूट अर्थात तीव्र (अचानक) किंवा क्रॉनिक (दीर्घकाळ) असे प्रकार आहेत. याबद्दल सविस्तर माहिती डॉ. समर्थ आर्य यांनी दिली आहे. अॅक्यूट इन्ज्युरिज 1. एसीएल टीअर : एसीएल अर्थात इन्टिरिअर क्रुसीएट लिगामेंट हे फेमरला टिबियाच्या (पोटऱ्यांचा पुढील भाग) वरती जोडते. हे गुडघ्यातील वारंवार दुखापतग्रस्त होणारे अस्थिबंधन म्हणजेच लिगामेंट आहे. एसीएल हे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आणि नैसर्गिकरित्या जोडलेले असतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आंधळे होण्याचा धोका? तज्ज्ञांनी सांगितले सत्य एसीएल फाटल्यास कशी काळजी घ्यावी - एसीएल टीअर बरा होण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये सातत्याने स्थिरता ठेवणं, प्लायमेट्रिक्स आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंग हे महत्त्वाचे घटक असतात. स्टॅबिलिटीच्या उपायांमध्ये न्यूरो मस्क्युलर नियंत्रण, डायनॅमिक जॉईंट स्टॅबिलिटी, प्रोपिओसेप्शन, बॅलन्स आणि सिंगल लेग ट्रेनिंग यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
2. मेनिस्कर टीयर : मेनिस्कर हा कुर्चाचा एक तुकडा असतो. हा तुकडा फेमर आणि टिबियाच्या दरम्यान असतो. त्यामुळे कुशनला आघातापासून संरक्षण मिळतं. मेनिस्कस टीयर ही एसीएल टीयर नंतरची दुसरी सर्वांत सामान्य गुडघ्याची दुखापत आहे. मेनिस्कस दुखावल्यास अशी घ्या काळजी - या दुखापतीपासून बचाव करण्यासाठी किंवा दुखापत टाळण्यासाठी हिप एक्सटेन्सर्स, नी फ्लेक्सर्स आणि नी एक्सटेन्सर्समध्ये पुरेशी ताकद येण्याकरिता किमान शारीरिक हालचाली करणं, वॉर्म-अप करणं, वजन नियंत्रणात ठेवणं, लवचिकता कायम ठेवणं गरजेचं आहे. 3. अँकल स्प्रेन अर्थात घोटा लचकणं : स्प्रेन्स म्हणजे एखादे अस्थिबंधन अतिताणले जाणं, लचकणं किंवा फाटणं होय. ही समस्या सामान्यतः घोटा, गुडघा, मनगट किंवा अंगठ्यात निर्माण होते. मात्र त्यातही घोट्यात ही समस्या जास्त प्रमाणात आढळते. अशी टाळा अँकल स्प्रेनची समस्या - घोट्याला दुखापत झाल्यास किंवा हा त्रास टाळण्यासाठी तुम्ही न्यूरोमस्क्युलर ट्रेनिंग प्रोग्रॅमची मदत घेऊ शकता. हा या समस्येवरचा प्रमुख उपाय आहे. अँकल इंज्युरी प्रीव्हेन्शन प्रोग्रॅममध्ये लवचिकता (सामान्य गती पुन्हा येण्यासाठी), चपळता, संतुलन, प्लायमेट्रिक्स आणि स्ट्रेन्थ ट्रेनिंगचा समावेश असतो. 4. स्नायूंवरील ताण : स्नायू किंवा स्नायूबंध हे हाडाशी जोडलेले असतात. हे स्नायू किंवा स्नायूबंध एखाद्या दुखापतीमुळे ताणले जातात अथवा फाटतात. कोणत्याही स्नायूंना ताण येऊ शकतो. अॅथलिट्समध्ये पोटरी, हॅमस्ट्रिंग, क्वाड्रिसेप्स किंवा रोटेटर कफच्या स्नायूंना दुखापत होणं हे सर्वात सामान्य आहे. कारण वेगाचं नियंत्रण या स्नायूंवर अवलंबून असतं. स्नायूंवरचा ताण कमी कसा कराल - योग्य वॉर्म-अप, किमान हालचालींच्या पद्धती (स्नायू लवचिकतेसह),आतील भाग स्थिरता ठेवणं, आणि हालचालींवर चांगले नियंत्रण हे स्नायूंवरचा ताण टाळण्यासाठीचे सर्वोत्तम उपाय आहेत. 5. बर्साटीस अर्थात सांध्याचे वंगण साठवणाऱ्या पिशवीचा दाह : बर्सा ही काही प्रमुख सांध्यांमधील स्नायूबंधाशेजारी द्रव पदार्थाने भरलेली पिशवी असते. सांध्यांची हालचाल होताना त्यांचे घर्षण टाळण्याचे काम ही पिशवी करते. बर्साटीस या अर्थ या पिशवीत वेदना, जळजळ होणं होय. ही समस्या कोणत्याही बर्सा सॅकमध्ये निर्माण होऊ शकते. परंतु, सामान्यत: नितंब, गुडघा, खांदा, घोटा किंवा कोपरामध्ये ही समस्या दिसून येते. Health Tips : कमी वयात पांढरे होतायत केस? दुर्लक्ष टाळा, या गंभीर त्रासांचे असू शकते लक्षण बर्साटीस टाळण्यासाठी काय कराल - जॉईंट स्टॅबिलिटीवर लक्ष केंद्रित करणारे प्रशिक्षण कार्यक्रम बार्साटिस रोखण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच एखाद्या विशिष्ट कालावधीत दुखापतीचा जास्त धोका असलेल्या अॅथलिटकडे बारकाईने लक्ष देणं उपयुक्त ठरू शकतं.