JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / Kolhapur: दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

Kolhapur: दागिने लुटण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल; कारनामा वाचून लावाल डोक्याला हात

Crime in Kolhapur: कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाला भामट्याने अनोख्या पद्धतीनं गंडा घातला आहे. तरुणानं वयोवृद्धाच्या डोळ्यादेखत त्यांच्या बोटातील अंगठी आणि गळ्यातील सोनं लंपास केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 17 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धाला भामट्याने अनोख्या पद्धतीनं गंडा घातला आहे. तरुणानं वयोवृद्धाच्या डोळ्यादेखत त्यांच्या बोटातील अंगठी आणि गळ्यातील सोनं लंपास (Theft gold ornaments) केलं आहे. या प्रकरणी वयोवृद्ध व्यक्तीनं पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तरुणाचा प्रताप ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. शाहूपुरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेचा तपास केला जात आहे. धुंडीराज छत्रे असं फिर्यादी वृद्धाचं नाव असून ते सरकारी सेवेतील निवृत्त कर्मचारी आहेत. फिर्यादी छत्रे हे दररोज सायंकाळी फिरण्यासाठी जातात. मंगळवारी घटनेच्या दिवशी देखील ते धैर्यप्रसाद मंगल कार्यालय ते सर्किट हाऊस रस्त्यावर चालण्यासाठी गेले होते. यावेळी दुचाकीवरून एक तरुण त्यांच्याजवळ आला. त्यानं आपण लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यातील पोलीस असून या परिसरात गस्त घालत असल्याचं सांगितलं. हेही वाचा- हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला पासवर्ड उलगडणार गूढ तसेच, सध्या या परिसरात चोरीचं प्रमाण वाढलं असून हातातील अंगठी आणि गळ्यातील गोफ काढण्यास सांगितलं. संबंधित तरुण पोलीस असल्याचं समजून छत्रे यांनी गळ्यातील गोफ आणि हातातील अंगठी तरुणाकडे दिली. तरुणानं हे दागिने एका कागदात गुंडाळून फिर्यादीला परत दिले. पण काही वेळाने त्यांनी कागदाची पुडी उलगडून पाहिली असता, त्यामध्ये दगड आणि केवळ गोफच होता. तरुणाने हातचलाखी करत छत्रे यांच्या डोळ्यादेखत त्यांचे दागिने लंपास केले. हेही वाचा- दिवसभर एकत्र फिरले अन् रात्री घडलं भलतंच; मित्राच्या हातूनच तरुणाचा दुर्दैवी अंत तसेच कागदाच्या पुडीत दागिन्यांऐवजी दगड आणि गोफ ठेवला. हा प्रकार घडल्यानंतर धुंडीराज छत्रे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या