मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला मोबाइल पासवर्ड उलगडणार गूढ

हनी ट्रॅपला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन? चिठ्ठीत लिहिलेला मोबाइल पासवर्ड उलगडणार गूढ

Suicide in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीवर आपल्या मोबाइलचा पासवर्ड (Mobile Password) लिहून ठेवला आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 16 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील इचलकरंजी येथे एका तरुणाने आत्महत्या (young man commits suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एका चिठ्ठीवर आपल्या मोबाइलचा पासवर्ड (Mobile password) लिहून ठेवला आहे. मोबाइल पासवर्डच्या आधारे पोलीस तरुणाच्या आत्महत्ये मागील कारणाचा शोध घेत आहे. हनी ट्रॅपला (Honey trap) कंटाळून तरुणानं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास केला जात आहे.

संबंधित घटना कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी येथील सुतार मळा परिसरात घडली आहे. येथील 32 वर्षीय तरुण मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्याचं आपल्या कुटुंबाशी आणि मित्रांशी बोलणं कमी झालं होतं. तसेच त्याच्या वागण्यातही फरक पडला होता. यातूनच त्यानं सोमवारी दुपारी दुपारी आपल्या राहत्या घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

हेही वाचा-पत्नी दिवसभर फोनवर बोलायची; तरुणाने पत्नीला दिला भयावह शिक्षा

32 वर्षीय मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये मृत तरुणाने आपल्या मोबाइलचा पासवर्ड लिहून ठेवला आहे. संबंधित तरुणानं हनी ट्रॅपला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा-पत्नीचा अश्लील VIDEO बनवून पतीला अडकवलं जाळ्यात; तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीनं तरुणानं हे पाऊल उचललं असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. पोलीस मोबाइल पासवर्डच्या आधारे मोबाइलचा तांत्रिक तपास करत आहेत. आत्महत्येच्या नेमक्या कारणाची माहिती मोबाइलमधून मिळण्याची शक्यता असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide