करवीर, 16 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी दोन मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ धक्कबुक्कीत (Hassle between 2 friends) एका तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. मृत आणि आरोपी तरुण हे चांगले मित्र होते. घटनेच्या दिवशीही दोघं दिवसभर एकत्र होते. पण रात्री साडेनऊच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला, यावेळी दोघांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर दुसरा मित्रही गंभीर जखमी (another friend injured) झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रदीप बाबूराव तेलवेकर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव असून ते करवीर तालुक्यातील वडणगे येथील शिवाजी गल्लीत वास्तव्याला होता. तर नीलेश सदाशिव पाटील असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असून सेंट्रींगचं काम करतात. दोघांचीही घरं एकमेकांच्या समोरासमोर आहेत. घटनेच्या दिवशी सोमवारी दोघंही दिवसभर एकत्रच होते. पण रात्री साडे नऊच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद उफाळला.
हेही वाचा-पत्नीचा अश्लील VIDEO बनवून पतीला अडकवलं जाळ्यात; तरुणासोबत घडला विचित्र प्रकार
हा वाद वाढत गेल्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि प्रदीप खाली जमिनीवर कोसळला. खाली पडल्यानंतर त्याची तिथेच शुद्ध हरपली. यानंतर नातेवाईकांनी त्याला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी दाखल केल्यानंतर, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. या घटनेत नीलेशही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
हेही वाचा-जळगावात दुचाकीस्वाराने गर्भवतीला नेलं फरफटत; पोटावरून बाईक गेल्यानं भयावह अवस्था
याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. पोलिसांनी अद्याप संशयित आरोपीला अटक केली नसून घटनेचा तपास सुरू आहे. दोन मित्रांच्या किरकोळ कारणातून झालेल्या धक्काबुक्कीत एकाचा प्राण गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांच्या घरासमोर पोलीस तैनात केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Murder