JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / पशुपालनाच्या आड कोट्यवधींचा अमली पदार्थाचा व्यवसाय? 2 दिवसांपासून मुंबई पोलीस कोल्हापुरात

पशुपालनाच्या आड कोट्यवधींचा अमली पदार्थाचा व्यवसाय? 2 दिवसांपासून मुंबई पोलीस कोल्हापुरात

Crime in Kolhapur: गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पोलीस कोल्हापुरातील ढोलगरवाडी येथे ठाण मांडून बसले आहेत. पोलिसांनी येथील एका फार्म हाऊसवर छापा (Raid at farm house) टाकला असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागल्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 16 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून मुंबई पोलीस ठाण मांडून बसले आहे. पोलिसांनी ढोलगरवाडी येथील एका फार्म हाऊसवर छापा टाकला असून गेल्या दोन दिवसांपासून याठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांची ही कारवाई पूर्ण झाली नाही. संबंधित कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा पोलिसांच्या हाती लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेचं गूढ वाढतच चाललं आहे. अलीकडेच, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषन विभागाकडे एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी संबंधित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर एमडी नावाचा अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर छापा टाकला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलीस याठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. हेही वाचा- दिवसभर एकत्र फिरले अन् रात्री घडलं भलतंच; मित्राच्या हातूनच तरुणाचा दुर्दैवी अंत सोमवारी देखील पोलिसांची ही कारवाई पूर्ण झाली नाही, त्यामुळे या कारवाईबाबत गूढ निर्माण होतं आहे. एमडी नामक अमली पदार्थाचे ढोलगरवाडी कनेक्शन स्पष्ट करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने गृह खात्याचे आणि नार्कोटिक्स पथकाला पाचारण केलं आहे. पण संबंधित पथकाला घटनास्थळी विलंब झाल्यानं सोमवारीही तपास पूर्ण झाला नाही. पण तपासासाठी लागणारा वेळ आणि तपास अधिकाऱ्यांनी पाळलेली कमालीची गुप्तता पाहता कोल्हापूरात मोठं ड्रग्स रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. हेही वाचा- लग्न जमत नसल्याने मुलीला हुंडा देत थाटला संसार; तिसऱ्याच दिवशी नवरीनं दाखवला रंग ढोलगरवाडी येथील संबंधित फार्म हाऊसवर म्हशी, घोडे आणि कोंबड्याचं पशुपालन केल्याचं चित्र स्थानिकांसमोर उभं केलं होतं. त्यामुळे पशुपालनाच्या आड सुरू असलेल्या कृत्याचा गावकऱ्यांना देखील सुगावा लागला नाही. याठिकाणी पशुपालनाच्या नावाखाला अमली पदार्थ तयार करण्याचं काम सुरू होतं. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या