JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / देशासाठी लढण्याचं स्वप्न हवेत विरलं; रणभूमीत जाण्याआधीच कोल्हापुरातील जवानाला मृत्यूनं गाठलं

देशासाठी लढण्याचं स्वप्न हवेत विरलं; रणभूमीत जाण्याआधीच कोल्हापुरातील जवानाला मृत्यूनं गाठलं

भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या कोल्हापुरातील एका जवानाचा रणभूमीत जाण्याआधीच मृत्यू झाला आहे. प्रशिक्षण घेत असतानाच संबंधित जवानाला मृत्यूनं गाठलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 14 नोव्हेंबर: भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या कोल्हापुरातील (Kolhapur) एका जवानाचा रणभूमीत जाण्याआधीच मृत्यू (indian soldier death) झाला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊ याठिकाणी प्रशिक्षण (Training) घेत असतानाच, जवानाला मृत्यूनं गाठलं आहे. त्यामुळे देशासाठी लढण्याचं त्याचं स्वप्न हवेत विरलं आहे. 22 वर्षीय तरुणाचा प्रशिक्षणादरम्यान अचानक मृत्यू झाल्यानं कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शनिवारी मृतदेह कोल्हापुरात आणल्यानंतर, जवानास अखेरची मानवंदना देण्यात आली आहे. शोकाकुल वातावरणात संबंधित जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सौरभ सुनील कुंभार (Saurabh Sunil Kumbhar) असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. सौरभ हा कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरातील सरनाईक माळ येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी सौरभची भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. दलात भरती करण्यापूर्वीच्या प्रशिक्षणालाही सुरुवात झाली होती. दरम्यान गुरुवारी अचानक त्याचं निधन झालं आहे. सौरभ हे लखनऊमध्ये नंबर दोन टेक्निकल विंगमध्ये प्रशिक्षण घेत होते. हेही वाचा- सांगोला: अपघात घडवून 45लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; मित्रच निघाला मास्टरमाइंड याठिकाणी प्रशिक्षण घेत असताना त्यांची प्रकृती खालावली होती. न्यूमोनिया झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर सौरभवर मेडिकल कॉलेज आणि सेंटरमध्येच उपचार केले जात होते. उपचारादरम्यान गुरुवारी सौरभ यांची प्राणज्योत मालवली आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शनिवारी मृतदेह कोल्हापूर आणल्यानंतर त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. सौरभला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. आमदार चंद्रकांत जाधव यांनी देखील सौरभच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आहे. हेही वाचा- मुलाच्या वाढदिवशी घरी येण्याचं वचन, पण अतिरेकी हल्ल्यात जवान शहीद निवृत्त वायुसैनिक एम डी देसाई यांनी लिहिलेलं पुस्तक वाचल्यानंतर, त्यानं लष्करात भरती होण्याची जिद्द मनाशी बाळगली होती. बरेच दिवस मेहनत केल्यानंतर, दोन वर्षांपूर्वी मराठा बटालियनमधून त्याची लष्करात भरती झाली होती. मृत जवान सौरभचे वडील सुनील कुंभार यांचं किराणा दुकान आहे. तर आई गृहिणी आहे. सौरभच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर नातेवाईकांना धक्का बसला असून त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या