मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अपघात घडवून 45 लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; सोबत नेलेला मित्रच निघाला मास्टरमाइंड, सांगोल्यातील थरारक घटना

अपघात घडवून 45 लाखांचं सोन्याचं बिस्किट पळवलं; सोबत नेलेला मित्रच निघाला मास्टरमाइंड, सांगोल्यातील थरारक घटना

Crime in Solapur: दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात एक किलो सोन्याच्या बिस्किटाची जबरी चोरी (gold biscuit robbery) झाल्याची एक घटना उघडकीस आली होती. अवघ्या 48 तासांत पोलिसांनी या चोरीच्या घटनेची उकल केली आहे.

Crime in Solapur: दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात एक किलो सोन्याच्या बिस्किटाची जबरी चोरी (gold biscuit robbery) झाल्याची एक घटना उघडकीस आली होती. अवघ्या 48 तासांत पोलिसांनी या चोरीच्या घटनेची उकल केली आहे.

Crime in Solapur: दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात एक किलो सोन्याच्या बिस्किटाची जबरी चोरी (gold biscuit robbery) झाल्याची एक घटना उघडकीस आली होती. अवघ्या 48 तासांत पोलिसांनी या चोरीच्या घटनेची उकल केली आहे.

सांगली, 14 नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी सांगोल्यात (Sangola) एक किलो सोन्याच्या बिस्किटाची जबरी चोरी (gold biscuit robbery) झाल्याची एक घटना उघडकीस आली होती. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना आरोपींनी चारचाकी वाहनाने फिर्यादीच्या गाडीला धडक मारून त्यांच्याकडील 45 लाख रुपये किमतीचं सोन्याचं बिस्किट चोरून (Plot accident and theft 45 lakh worth gold biscuit) नेलं होतं. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 48 तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. सोबतीला नेलेला मित्रच या जबरी चोरीचा मास्टरमाइंड निघाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक (3 accused arrested) केली असून अन्य एकाचा शोध घेतला जात आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील रहिवासी असणारे सुशांत बापुसाहेब वाघमारे यांना त्यांचे मालक विजय काटकर यांनी त्यांच्याकडील सुमारे 995 ग्रॅम वजनाचे जुने सोने देऊन सांगोला येथील महाकालीच्या दुकानातून दागिने गाळून शुद्ध करून त्याचे बिस्कीट तयार करून आणण्याचं काम दिलं होतं. या कामासाठी सुशांत आपल्या एका मित्राला सोबत घेऊन सांगोल्याला गेला होता. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघंही दुचाकीने सांगोला याठिकाणी गेले होते. याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी महाकाली दुकानात जाऊन दागिने गाळून त्याचे बिस्किट तयार करण्यासाठी टाकलं.

हेही वाचा-Pune: कंपनीत सोबत काम करणाऱ्या तरुणीवर रेप; जेवण बनवण्यासाठी घरी बोलावलं अन्...

सोन्याचं बिस्किट तयार झाल्यानंतर सुशांत व त्याचा मित्र सायंकाळी साडेसातच्या सुमारास परत दुचाकीने दिघंचीकडे येण्यास निघाले. दरम्यान‌ रात्री साडेआठच्या सुमारास एकतपुर- आचकदाणी रोडवरून फॉरेस्ट जवळील बागलवाडी शिवारापासून जात असताना, पाठीमागून आलेल्या एका अनोळखी चारचाकी गाडीने भरधाव वेगात येऊन सुशांतच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. यामुळे सुशांत आणि त्याचा मित्र दोघंही रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चारीत जाऊन पडले.

हेही वाचा-शाळेत शिक्षकाकडून सुरू होतं लैंगिक शोषण; बारावीतील मुलीनं उचललं भयावह पाऊल

यावेळी धडक देणारी चारचाकी गाडीही रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन अडकली. यावेळी चारचाकीतून दोघेजण बाहेर आले. त्यांनी सुशांतला हाताने आणि दगडाने मारहाण करायला सुरुवात केली. आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन काढून घेत, त्यांच्या खिशातील सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे बिस्किट जबरदस्तीने काढून घेतलं. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीचं वाहन पेटवून देत घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी सुशांत वाघमारे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

हेही वाचा-शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी रचला खुनाचा कट; पण डाव उलटला अन् कुटुंबासह झाली गजाआड

फिर्याद दाखल झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दीपक प्रकाश जावळेकर (वय 23 रा. दिघंची ता. आटपाडी जिल्हा सांगली), अनिल चंद्रकांत भोसले (वय 23, अहिल्यानगर, मिरज, जिल्हा सांगली) आणि प्रशांत पाटील (वय 21, राहणार खामकरवाडी, वाशी, जिल्हा उस्मानाबाद)

अशी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींची नावं आहेत. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संबंधित आरोपींपैकी एकाचं शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. कर्जबाजारीपणामुळे त्याने ही चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gold robbery, Solapur