JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / रक्ताची नाती जीवावर उठली; कोल्हापूरात मुलाच्या मदतीनं सख्ख्या भावाचा काढला काटा

रक्ताची नाती जीवावर उठली; कोल्हापूरात मुलाच्या मदतीनं सख्ख्या भावाचा काढला काटा

Murder in Kolhapur: कोल्हापुरात शेतीच्या वादातून (Farm land dispute) भावाने आपला मुलगा आणि जावयाच्या मदतीने सख्ख्या भावाची निर्घृण हत्या (Brutal Murder) केली आहे. आरोपीने आपल्या चार बहिणींच्या डोळ्या देखत धाकट्या भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे.

जाहिरात

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 06 जून: कोल्हापुरात शेतीच्या वादातून (Farm land dispute) भावाने आपला मुलगा आणि जावयाच्या मदतीने सख्ख्या भावाची निर्घृण हत्या (Brutal Murder) केली आहे. आरोपीने आपल्या चार बहिणींच्या डोळ्या देखत धाकट्या भावाला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, धाकट्या भावाने जाग्यावरच तडफडून प्राण (Brother Death) सोडला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित 50 वर्षीय मृत भावाचं नाव भगवान रामचंद्र बुचडे असून तो करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी येथील रहिवासी आहे. तर हत्या करणाऱ्या भावाचं नाव भैरवनाथ रामचंद्र बुचडे (वय 55) आहे. आरोपी भावाने आपला मुलगा विकास आणि जावई सुधीर थोरात यांच्या मदतीने ही हत्या केली आहे. खरंतर गेल्या चार वर्षापासून मृत भगवान आणि भैरवनाथ या दोन भावांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद सुरू होता. मागील काही महिन्यापासून त्यांच्यात सातत्याने भांडणं होतं होती. अशातच मृत भगवान यांनी आपल्या घराच्या पाठीमागे गुरांसाठी गोठा बांधायला सुरुवात केली. यातूनच वादाला तोंड फुटलं. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असतानाच पुतण्या विकास बुचडे घराकडे धावत गेला. त्याने घरातील धारदार सुरा घेऊन चुलत्याच्या शरीरावर सपासप वार केले. वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महेशवर आरोपी बापलेकांनी हल्ला केला. त्याचबरोबर या हाणामारीत आरोपीचा जावई सुधीर थोरातने मदत केली. आरोपी बापलेकाने फूटभर लांबीच्या सुर्‍याने भगवान यांच्या छातीसह पोट, कंबर, पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात भगवान यांचा रक्ताच्या थारोळ्यात तडफडून मृत्यू झाला. बहिणींच्या डोळ्यादेखत घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीयांचा आक्रोश काळीज हेलावणारा होता. हे ही वाचा- लातूरात सुनेनं केला सासूचा खून, संशयाची सुई फिरताच हत्येचा झाला उलगडा याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींनी ताब्यात घेतलं असून संबंधित हत्येत जावयाच्या सहभागाची चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या