• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लातूरमध्ये गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून, 'असा' झाला हत्येचा उलगडा

लातूरमध्ये गळा आवळून सुनेनं केला सासूचा खून, 'असा' झाला हत्येचा उलगडा

Latur Crime News: सुनेनं आपल्या सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur Crime News) घडली आहे. धक्कादायक म्हणजे सुनेनं मुलाला हाताशी धरून सासूचा खून केल्याचं समजतंय.

 • Share this:
  लातूर, 06 जून: सुनेनं आपल्या सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये (Latur Crime News) घडली आहे. धक्कादायक म्हणजे सुनेनं मुलाला हाताशी धरून सासूचा खून केल्याचं समजतंय. गैरकृत्य करण्याला विरोध करणाऱ्या सासूला जिवाला मुकावं लागलं आहे. सून आणि नातवानं गळा आवळून ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी निलंगा पोलिसांनी सून आणि नातवाला अटक केली आहे. (Daughter in law murdered her mother in law) नेमकी घटना काय? ही घटना लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील उमरगा हाडगा या गावातील आहे. दोन दिवसांपूर्वी 75 वर्षांच्या रुक्मिणबाई राजाराम माने या महिलेचा मृत्यू झाला. रुक्मिणबाई यांचा मुलगा शिवाजी याला आपल्या आईचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय आला. यावेळी त्यांना आपली पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांच्यावर संशय होता. शिवाजी हा शासकीय नोकरीला आहे. मात्र पत्नी ही त्याच्यापासून फारकत घेऊन बाजूलाच राहते. मात्र शिवाजी आपल्या आईबरोबर राहत होता. शिवाजी आपल्या पत्नीला पोटगी देतो. मात्र पोटगी मिळत असतानाही पत्नी ललितानं घरावर कब्जा केला होता. हेही वाचा- मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, उकाड्यापासून थोडा दिलासा शिवाजी दिवसभर कामावर असायचा. त्यावेळी पत्नी ललिता गैरकृत्य करायची आणि याच गैरकृत्यांना सासू रुक्मिणबाई विरोध करत होत्या. याच विरोधाचा राग मनात ठेवून ललितानं आपला मुलगा गणेशला हाताशी घेतलं आणि रुक्मिणबाई यांचा गळा आवळून खून केला. सकाळी रुक्मिणबाई मृतवस्थेत घरात सापडल्या. रात्री व्यवस्थित असणारी आपल्या आईला काय झालं, असा प्रश्न शिवाजीला पडला. आपल्या आईचा खून झाल्याचा संशय शिवाजीला आला. त्यानं तात्काळ निलंगा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्याचं आलं. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अनैसर्गिक मृत्यू असल्याचं निष्पन्न झालं. मुलाच्या संशयामुळे पोलिसांनी शिवाजीची पत्नी ललिता आणि मुलगा गणेश यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता दोघांनी आपला गुन्हा कबूल केला.
  Published by:Pooja Vichare
  First published: