JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / आजीनं केलेला अपमान जिव्हारी, तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

आजीनं केलेला अपमान जिव्हारी, तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Suicide in Kolhapur: आजी रागावल्याचा राग मनात धरून कोल्हापूरातील एका 19 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या केली आहे.

जाहिरात

आजी रागावल्याचा राग मनात धरून कोल्हापूरातील एका 19 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या केली आहे. (फोटो-लोकमत)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गडहिंग्लज, 11 ऑगस्ट: कोल्हापूरातील (Kolhapur) गडहिंग्लज याठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आजी रागावल्याचा राग (Grandmother Get Angry) मनात धरून एका 19 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या (Young Woman Commits Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीनं रविवारी (8 ऑगस्ट) विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काही वेळात तिला अस्वस्थ वाटत असल्याचं कुटुंबीयांना कळताच तिला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीनं अखेरचा श्वास घेतला आहे. पूजा सुरेश भुसुरी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव असून ती गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील रहिवासी होती. मृत पूजाचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. रविवारी सकाळी ती नेहमीपेक्षा उशीरापर्यंत झोपली होती. खूप उशीरापर्यंत झोपल्यानं आजी तिला रागावली होती. आजीनं केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणीनं विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हेही वाचा- मृत्यूपूर्वीची अखेरची सेल्फी: 8 महिन्यांच्या बाळासमोर विवाहितेची आत्महत्या विष प्यायल्यानंतर कालांतरानं पूजाला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे नातेवाईकांनी तिला त्याच दिवशी कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दुसऱ्या दिवशी सोमवारी (9 ऑगस्ट) तिला गडहिंग्लज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी पूजानं अखेरचा श्वास घेतला आहे. हेही वाचा- घरच्यांना समजले प्रेमसंबंध अन्… सांगलीत नर्सनं उचललं धक्कादायक पाऊल केवळ उशीरापर्यंत झोपल्यामुळे रागावल्याच्या कारणातून तरुणीनं जीव दिल्यानं गावात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. डॉ. पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या